जिल्हा उद्योग केंद्रातील पदनामात बदल; महाव्यवस्थापक ऐवजी ‘सहायक आयुक्त (उद्योग व सेवा)’
जिल्हा उद्योग केंद्रातील पदनामात बदल; महाव्यवस्थापक ऐवजी ‘सहायक
आयुक्त (उद्योग व सेवा)’
बुलढाणा,
दि. 1 (जिमाका) : जिल्हा
उद्योग केंद्र, बुलढाणा कार्यालयातील कार्यालयीन पत्रव्यवहार आणि दैनंदिन
कामकाजामध्ये सुधारित पदनामाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्योग
व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच उद्योग आयुक्तालय, मुंबई यांच्या
परिपत्रकानुसार जिल्हा उद्योग केंद्रातील पदनामात सुधारणा करण्यात आली आहे.
त्यानुसार यापुढे ‘महाव्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्र’ या पदनामाऐवजी ‘सहायक
आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र’ असे सुधारित पदनाम
वापरण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या सर्व कार्यालयीन पत्रव्यवहारात
तसेच कार्यालयीन कामकाजात या सुधारित पदनामाचा उल्लेख करावा, अशा सूचना देण्यात
आल्या आहेत. संबंधित शासन निर्णय व उद्योग
आयुक्तालयाच्या परिपत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन सहायक
आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment