जन्म-मृत्यू नोंदणी आता केवळ CRS Portal द्वारेच; समांतर प्रणाली वापरण्यास बंदी

 



बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जन्म व मृत्यू नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया आता भारत सरकारच्या Civil Registration System (CRS) Portal द्वारेच राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व निबंधक, उपनिबंधक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार जन्म व मृत्यू नोंदणीसाठी CRS Portal व्यतिरिक्त कोणतीही स्वतंत्र, स्थानिक अथवा समांतर सॉफ्टवेअर प्रणाली वापरता येणार नाही. यापूर्वी नोंद न झालेल्या जन्म किंवा मृत्यू घटनांची नोंद 'Add Old Event' या सुविधेद्वारे CRS Portal वर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच जन्म व मृत्यू नोंदीतील दुरुस्ती, अद्ययावत माहिती, प्रमाणपत्र निर्गमित करणे तसेच इतर सर्व सेवा केवळ CRS Portal मार्फतच उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी उपलब्ध मूळ अभिलेखांच्या आधारे अचूक माहिती नोंदवून नियमानुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील जन्म व मृत्यू नोंदींचा एकसंध डिजिटल डेटाबेस तयार होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक पारदर्शक, अचूक आणि सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच समांतर प्रणालीचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर प्रचलित नियमांनुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या