मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी अंतरराज्य अभ्यास दौरा

 


बुलढाणा दि.23 (जिमाका): मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून मत्स्योत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्य उद्योजक, हॅचरी धारक, मत्स्य प्रक्रिया केंद्र धारक तसेच मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी अंतरराज्य प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी राज्य शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाणार असून, लवकरच MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रगतीशील मत्स्यकास्तकारांची निवड करून त्यांना मत्स्यव्यवसायात अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये तसेच केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय संशोधन संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासातून अत्याधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन याबाबतचे ज्ञान मिळणार असून त्याचा उपयोग जिल्ह्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी होणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १० मत्स्यकास्तकारांची निवड करण्यात येणार असून, प्रत्येक अभ्यास दौऱ्याची प्रकल्प किंमत २ लाख ५० हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील आणि छायाचित्र या आवश्यक कागदपत्रांसह MahaDBT या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा. तसेच योजनेविषयी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमार व मत्स्यशेती करणाऱ्या लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या