इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 15 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ बुलढाणा जिल्हा कार्यालयामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध स्वयंरोजगार, व्यवसाय व शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळामार्फत मुख्य कंपनी व 13 उपकंपन्यांच्या माध्यमातून लघुउद्योग, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी कर्जपुरवठा केला जातो. यंदाच्या वर्षासाठी विविध योजनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये थेट कर्ज योजना (1 लाख), 20 टक्के बीज भांडवल योजना (5 लाख), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (15 लाख), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (20 लाख), गट कर्ज व्याज परतावा योजना (50 लाख) तसेच महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा. तसेच 07262-248285 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्जाची माहिती मिळवता येईल.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित