‘पराक्रम दिन’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व फिल्म स्पर्धांचे आयोजन; शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

 


बुलढाणा दि.31 (जिमाका): महाराष्ट्र सैनिक, जुनी व माजी सैनिक प्रतिष्ठान (अमर) यांच्या वतीने भारतीय सैन्याच्या शौर्यगाथा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ‘पराक्रम दिन’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि लघुपट (फिल्म) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहेत.

पराक्रम दिन साजरा करण्यामागील उद्देश राज्यातील वीर सैनिकांच्या कार्याचा गौरव करणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य, त्याग आणि कर्तव्यभावना रुजविणे हा आहे. या स्पर्धांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

निबंध स्पर्धेत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत जास्तीत जास्त १,००० शब्दांचा निबंध लिहून तो पीडीएफ स्वरूपात संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत पाच मिनिटांचे भाषण तयार करून त्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. फिल्म स्पर्धेत मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लघुपट तयार करून तोही संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. लघुपटासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास परवानगी असून, चित्रिकरणासाठी मोबाईल, टॅबलेट किंवा ड्रोनचा वापर करता येणार आहे.

स्पर्धेचे नियम, विषय, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती https://parakramdin.mahabhumit.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी करून देशभक्तीची प्रेरणा देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या