पेनटाकळी धरण 56.51 टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 


बुलढाणा दि.31 (जिमाका): पेनटाकळी प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरू असून शुक्रवार (३१ जुलै) रोजी धरणातील जलसाठा 56.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याची आवक वाढल्यास धरणातून विसर्ग करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, प्रकल्पाच्या मंजूर जलाशय व द्वार संचालन सूचीनुसार जुलै अखेर धरणात 69 टक्के जलस्तर कायम ठेवण्याचे नियोजन आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यास तसेच उर्ध्व बाजूच्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग झाल्यास पेनटाकळी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीपात्रात विसर्ग सोडावा लागू शकतो.

जलसंपदा विभागाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच जनावरे, वाहने, शेती अवजारे, चल मालमत्ता व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन केले आहे. तसेच दवंडी किंवा मुनादीद्वारे नागरिकांना सूचना देऊन प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या