महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या : पात्र लाभार्थ्यांना आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) मार्फत विविध बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना व बीजभांडवल योजना अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यास ३५ लाभार्थ्यांचे भौतिक उद्दिष्ट व ८.७५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद प्राप्त झाली आहे. तसेच बीजभांडवल योजनेअंतर्गत ३५ लाभार्थ्यांचे भौतिक उद्दिष्ट असून १७.५० लाख रुपये अनुदान व १७.३१ लाख रुपये बीजभांडवलासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे.

 

अनुदान योजनेअंतर्गत विविध बँकांमार्फत ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. त्यापैकी २५ हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. तर बीजभांडवल योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध असून, नियमानुसार ५० हजार रुपये अनुदान आणि ५० हजार रुपयांपर्यंत बीजभांडवल दिले जाते.

या योजनांचा लाभ अनुसूचित जाती (चांभार व मातंग प्रवर्ग वगळता) तसेच नवबौद्ध प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह "महादिशा (MahaDisha)" या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन कर्ज मागणी अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन