वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांचा दौरा;

 


       जिगाव धरण प्रकल्पाची पाहणी

       नांदुरा रेल्वेस्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती

 

बुलढाणा,दि. 16 (जिमाका) : वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय वामन सावकारे हे शुक्रवार दि. 17 जुलै 2026 रोजी नांदुरा जि. बुलढाणा दौऱ्यावर येत आहे.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. 17 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता भुसावळ येथून नांदुरा जि. बुलढाणा  येथे आगमन व जिगाव धरण प्रकल्पाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जिगाव धरण प्रकल्प येथे आगमन व प्रकल्पाची पाहणी. दुपारी 12.30 वा. जिगाव धरण प्रकल्प येथुन शासकीय विश्रामगृह नांदुराकडे प्रयाण व दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह नांदुरा येथे भाजपा पदाधिकारी व आमदार चैनसुखी संचेती यांच्यासोबत विविध विषयावर बैठक. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून रेल्वेस्टेशनकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता नांदुरा रेल्वेस्टेशनचे 75 वे अमृत स्थानकाचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता नांदुरा रेल्वेस्टेशन येथून भुसावळकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन