मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती; २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 14 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने मातंग समाज व तत्सम
बारा पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती
योजना राबविण्यात येत आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर
तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा
अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात
आले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना गुणक्रमांक व उपलब्ध
निधीनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू
व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या योजनेचा उद्देश
आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला,
उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे
फोटो, आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत आदी आवश्यक कागदपत्रांसह दि. २७ जुलै २०२६ पर्यंत
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन प्रस्ताव
सादर करावेत. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शिष्यवृत्तीसाठी
वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दि. शं. पाखमोडे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment