अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

 

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

बुलढाणा दि.31 (जिमाका): बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टे बुलढाणा ग्रामीण येथे मर्ग क्र. ३४/२०२६ कलम १९४ बीएनएसएस (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे. सुमारे ७० वर्षे वयाचा, अंदाजे ५.५ फूट उंचीचा अनोळखी इसम दिव्य सेवा प्रकल्प, वरवंडचे संचालक अशोक काकडे यांनी उपचारासाठी सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल केला होता. उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीचा २२ जुलै २०२६ रोजी मृत्यू झाला.

मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचा फोटो व वर्णनाच्या आधारे शोध सुरू आहे. सदर व्यक्ती आपल्या परिसरातून हरवलेली असल्याची माहिती कोणाकडे असल्यास किंवा संबंधित व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण ०७२६२-२४१२५५, पोलीस निरीक्षक आशिष रोही  ९६०७३०८२२४, तपास अधिकारी पोहेकॉ कैलास उगले (ब. नं. ७१४) : ८८८८८११७१४ तसेच, नागरिकांनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या