सीपीआर प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक बळकट

 



बुलढाणा, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (CPR) विषयावरील प्रशिक्षण सत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, शेलगाव आटोळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाले.

या प्रशिक्षणामध्ये अचानक हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णाला तातडीने जीवदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या सीपीआर तंत्राचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे मूल्यमापन, योग्य पद्धतीने छातीवर दाब (Chest Compression), कृत्रिम श्वसन (Rescue Breathing) तसेच रुग्णाला वेळेत पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणासाठी डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनिता जवंजाळ आणि सुलोचना पराड यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. स्नेहा पाटील, डॉ. वायाळ, डॉ. पैठणे, डॉ. गवाटे  आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना वेळेवर, दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या