सफाई कर्मचारी व चौकीदार पदांसाठी भरती; २७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 21 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा अंतर्गत सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृह तसेच सभामंडपासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी आणि चौकीदार पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी २७ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

           

भरती प्रक्रियेनुसार सफाई कर्मचारी पदासाठी २ सिव्हिलियन उमेदवार, तर चौकीदार पदासाठी २ माजी सैनिक उमेदवार नियुक्त करण्यात येणार आहेत. सफाई कर्मचारी पदासाठी उमेदवार किमान दहावीपर्यंत शिक्षित असावा आणि त्याचे वय ५० वर्षांपर्यंत असावे. ही नियुक्ती सैनिकी मुलांच्या वसतिगृह व सभामंडपासाठी करण्यात येणार आहे. चौकीदार पदासाठी केवळ सेवानिवृत्त माजी सैनिक पात्र असून उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण, वय ५० वर्षांपर्यंत तसेच संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. ही नियुक्ती सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी करण्यात येणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र तसेच वैयक्तिक अर्ज यांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. २७ जुलै २०२६ नंतर प्राप्त होणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या