अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 15 : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील युवक-युवतींना होत असून, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

या प्रशिक्षणात वैश्णवी भालेराव, राखी सेवक, चैतन्य जोशी, उमा परिहार आणि अक्षय परिहार यांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदविला. प्रशिक्षणामध्ये ड्रोनची रचना व कार्यपद्धती, सुरक्षित उड्डाण, शासकीय नियम व परवानग्या, कृषी फवारणी, भू-सर्वेक्षण, मॅपिंग, हवाई छायाचित्रण, व्हिडिओग्राफी आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे सहभागींच्या कौशल्यात लक्षणीय वाढ झाली असून कृषी सेवा, औद्योगिक सर्वेक्षण, डिजिटल कंटेंट निर्मिती, ड्रोन ऑपरेशन सेवा तसेच विविध तंत्रज्ञानाधारित व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सहभागी युवक-युवतींनी सांगितले.

जिल्हा व्यवस्थापक जिगेश कमाणी यांनी अधिकाधिक युवक-युवतींनी अमृतच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. इच्छुकांनी अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्र. ३०८, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९९२२२७९६३७ किंवा ७३८७९२५२१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या