जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन; • खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल



•           गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

बुलढाणा दि.23 (जिमाका):  विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार गणनापत्र (Enumeration Forms) डिजिटायझेशन मोहिमेत बुलढाणा जिल्ह्याने ७०.६६ टक्के प्रगती केली आहे. जिल्ह्यातील एकूण २० लाख ८९ हजार ९६५ मतदारांपैकी १४ लाख ७६ हजार ८१५ मतदारांचे गणनापत्र ऑनलाइन डिजिटायझेशन करण्यात आले आहे. उर्वरित मतदारांचे गणनापत्र लवकरात लवकर ऑनलाइन डिजिटायझेशन पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक ७९.०१ टक्के प्रगतीसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर मलकापूर (७५.४६ टक्के), जळगाव जामोद (७३.१६ टक्के) आणि चिखली (७२.६८ टक्के) या मतदारसंघांचा क्रमांक लागतो. तर मेहकर (अ.ज.) मतदारसंघात ६८.३४ टक्के, बुलढाणा मतदारसंघात ६४.८९ टक्के आणि सिंदखेड राजा मतदारसंघात ६२.२२ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

 मतदारसंघनिहाय प्रगती : मलकापूर येथे २ लाख ११ हजार २१४ (७५.४६%), बुलढाणा १ लाख ९२ हजार ९६२ (६४.८९%), चिखली २ लाख १९ हजार २७६ (७२.६८%), सिंदखेड राजा २ लाख १८५ (६२.२२%), मेहकर (अ.ज.) २ लाख ०६ हजार ४५८ (६८.३४%), खामगाव २ लाख ३२ हजार २७४ (७९.०१%), जळगाव जामोद  २ लाख १४ हजार ४४६ (७३.१६%) मतदारांचे ऑनलाईन गणना झाले आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडेल. यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या