जिल्ह्यात सरासरीच्या २१.३४ टक्के पावसाची नोंद; मेहकर तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान
बुलढाणा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात मान्सूनने समाधानकारक हजेरी लावली असून
७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण १६२.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद जिल्ह्याच्या
सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या २१.३४ टक्के इतकी आहे. मागील वर्षी याच कालावधीत १७९.७
मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
तालुकानिहाय
पाहता मेहकर तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २४२.१ मि.मी. पाऊस पडला असून तो तालुक्याच्या
सरासरीच्या २८.८७ टक्के आहे. त्याखालोखाल शेगाव येथे १६९.० मि.मी. (२४.७६ टक्के), मोताळा
येथे १७६.२ मि.मी. (२४.७३ टक्के), देऊळगाव राजा येथे १७१.७ मि.मी. (२४.३७ टक्के) आणि
बुलढाणा तालुक्यात २०९.८ मि.मी. (२४.३८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील
इतर तालुक्यांमध्ये चिखली येथे १६७.४ मि.मी., सिंदखेड राजा येथे १७१.० मि.मी., लोणार
येथे १७१.६ मि.मी., नांदुरा येथे १५०.६ मि.मी., जळगाव जामोद येथे १५२.७ मि.मी., संग्रामपूर
येथे १२८.४ मि.मी., खामगाव येथे १०५.८ मि.मी. आणि मलकापूर येथे ९७.० मि.मी. पावसाची
नोंद झाली आहे.
महसूल
विभागाच्या पर्जन्यमान विश्लेषणानुसार १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५३.४
मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याच्या या कालावधीतील सरासरीच्या २७.८ टक्के पाऊस नोंदविण्यात
आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी सहा पावसाळी दिवसांची नोंद झाली आहे.
महसूल
मंडळनिहाय आकडेवारीनुसार काही भागांमध्ये तुलनेने अधिक पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यातील
अंजनी मंडळात १२७.० मि.मी., संग्रामपूर मंडळात ११०.४ मि.मी., मेहकर मंडळात १०३.८ मि.मी.,
बुलढाणा तालुक्यातील म्हसळा मंडळात ९८.९ मि.मी., मोताळा मंडळात ९६.९ मि.मी. तसेच देऊळगाव
राजा शहर मंडळात ९२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांमध्ये
मान्सून सक्रिय असून खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागामार्फत
पर्जन्यमानावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत
आहेत.
00000
Comments
Post a Comment