पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : बुलढाणा जिल्ह्यात १२ हजार १०७ शेतकरी पात्र; आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन



बुलढाणा, दि. २४ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी पात्र ठरले असून, योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच अॅग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत नोंदणी व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तसेच, आधार क्रमांक आणि बँक खाते परस्पर लिंक नसल्यास संबंधित सहकारी संस्था किंवा बँकेशी संपर्क साधून ते तातडीने लिंक करून घ्यावे.

आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सहकारी संस्था, 'आपले सरकार' सेवा केंद्र किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी अथवा तक्रारी उद्भवल्यास संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या