दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार; पात्र दिव्यांगांनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावे

 


 

बुलढाणा, दि. 21 (जिमाका) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार २०२६ साठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, बुलढाणा जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर १५ मे ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जात इच्छुकांनी www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे बंधनकारक आहे.

 

या पुरस्कारांतर्गत सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन तसेच श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या विविध श्रेणींमध्ये अर्ज करता येणार आहेत. अर्ज सादर करताना यूडीआयडी (UDID) कार्ड अथवा दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

पुरस्कारासाठी आवश्यक पात्रता, निकष आणि इतर सविस्तर माहिती www.depwd.gov.in तसेच www.awards.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग बांधवांनी या राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या