तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार; २० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले

 


बुलढाणा, दि. 29 (जिमाका) :  भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय मार्फत साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Award - TNNAA) २०२५ साठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक खेळाडू व पात्र उमेदवारांनी दि. ३० जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

साहसी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सामान्यतः जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. तसेच साहसी क्षेत्रातील 'आजीवन योगदान' (Lifetime Achievement) या विशेष श्रेणीसाठीही स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पुरस्कारासाठी नामांकन करणाऱ्या खेळाडूंची सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांतील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. संबंधित कामगिरी ही जमीन, पाणी किंवा हवाई साहसी उपक्रमांतील असून ती अतिउत्कृष्ट स्वरूपाची असणे आवश्यक आहे.

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज https://awards.gov.in/ या केंद्र शासनाच्या पोर्टलवर सादर करावेत. मंत्रालयाकडे ऑफलाइन प्राप्त होणाऱ्या अर्जांची कोणतीही दखल घेतली जाणार नाही व असे अर्ज थेट नाकारले जातील, असेही श्रीमती आंब्रे यांनी स्पष्ट केले आहे. इच्छुक खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करून या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या