खामगाव येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 


 

बुलढाणा, दि. 01 (जिमाका): शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी खामगाव येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. वसतिगृहातील रिक्त जागांवर मागील वर्षाच्या गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

 

या प्रवेश प्रक्रियेत इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी, डिप्लोमा प्रथम वर्ष, पदवी प्रथम वर्ष, पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणारे पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज अचूक व परिपूर्ण भरावा. त्यानंतर अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

 

अधिकाधिक पात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव गृहपाल यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या