Wednesday 7 September 2022

DIO BULDANA NEWS 07.09.2022

 


जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 7 : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी आज राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अव्वल कारकुन शिला पाल, श्री. भोतेकर, नाझर संजय वानखेडे आदींनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस‍ अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा किडीचे व्यवस्थापन करावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : सध्यस्थितीत सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी स्पोडोप्टेरा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे फार गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीची प्रादुर्भावाची वेळ ही साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळ्यापानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. ज्यामुळे त्या दिसत नाहीत.

या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ही अंड्यातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळ्या समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्ये पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानांना छिद्र पाडत नाहीत. त्यामुळे असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. मोठ्या झाल्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात आणि पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळ्या फुलेही खातात.

या किडीचे व्यवस्थापन करताना सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखुची पाने खाणारी अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी आणि अळीग्रस्त पाने अलगद तोडून नष्ट करावीत. भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात 8 ते 10 प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत. 5 टक्के निंबोळी अर्क 50 मिली 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

अळीच्या व्यवस्थापनासाठी एसएलएनपीव्ही 500 एलई विषाणू 2 मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रिलाई या उपयुक्त बुरशीचा 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावे आणि निरिक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी ही 10 अळ्या प्रति मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी अशी आहे.

किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. यात किड कीटकनाशके प्रमाण प्रति 10 लिटर पाणी तंबाखूवरील पाने खाणारी अळी          फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली इमामेक्टीन बेन्झोएट 1.90 ईसी प्रति 4 ग्रॅम 8.5 मिली, टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी 5 मिली, स्पायनोटोरम 11.7 एससी    9 मिली, इंडोक्झाकार्ब 15.80 ईसी 6.7 मिली, नोव्हाल्युरोन 5.25 अधिक इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 15.5 मिली फवारणी करावी.

कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पंप पेट्रोल असल्यास हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा जेणेकरून विषबाधा होणार नाही, असे कृषि विभागाने कळविले आहे.

00000

तूर पिकावरील मारुका अळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यातील सध्यास्थितीतील वातावरण तूर पिकावरील मारूका अळीस पोषक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

तूर पिकावर काही ठिकाणी मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे. हे पिक कायीक वाढीच्या अवस्थेत आहे. लवकरच हे पिक फुलोरा अवस्थेत येईल. मात्र सद्यस्थितीत काही शेतामध्ये तुरीच्या शेंड्यावरील पाने जाळे विणून गुंडाळणारी अळी दिसून आली आहे.

फुले धरण्याच्या अवस्थेत ही मारूका अळी फुलांचे तसेच शेंगांचे नुकसान करते. मागील पंधरवड्यातील असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे. या वातावरणामुळे तूर पिकाला मारुका अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करावा.

किडीचे व्यवस्थापन करताना मारुका ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी किड आहे. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळे रंगाचे सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगाना एकत्रित करून जाळ्याने चिटकवून झुपके तयार करुन त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खातात.

तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम 18 ते 35 दिवसात पूर्ण होतो. किडीच्या व्यवस्थापनासाठी तूर पिक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीत पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव सरासरी 2 ते 3 अळ्या प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. यात फ्लूबेडामाईड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी 20 ग्रॅम किंवा नोवालूरोन 5.25 अधिक इंडोक्साकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000



प्रत्येक कार्यालयामध्ये महिला, बाल स्नेही कक्ष करावा

- एस. रामामुर्ती जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 7 : शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविल्यास एक स्नेहाचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येक कार्यालयात महिला व बालस्नेही कक्ष तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय, तसेच कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सखी वनस्टॉप सेंटर येथे महिला आणि बालस्नेही कक्षाचे उद्घाटन दिनांक मंगळवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, महिला आणि मुलांसोबत स्नेही आणि मैत्रीपूर्ण वातावरणात त्यांच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडविता येतील. मुलांसोबत खेळून बोलके करून त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेता येईल. कार्यालय महिला व बालस्नेही करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही बालस्नेही व्हावे.

बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज डांगे यांनी बालकांचे उद्याचे भविष्य पाहताना तो आज सुरक्षित राहण्याला महत्व आहे. बालके सुरक्षित राहिली तरच उद्याचे भविष्य उज्‍ज्वल आहे. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार जवळच्या व्यक्तीपासून होते. त्यामुळे बालकांना गुड टच आणि बॅड टचबाबत पालकांनी माहिती द्यावी असे सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी महिला व बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मनोसामाजिक प्रशिक्षण दिल्यास चांगले काम होण्यास मदत होईल, असे सांगितले. कार्यक्रमाला न्यायमूर्ती  एच. एच. भुरे, अशोक मारवाडी, रामेश्वर वसू, दिवेश मराठे, वैशाली सोमनाथे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. प्रा. इंदुमती लहाने, प्रा. शाहिना पठाण, स्नेहल चौधरी, रीना कोराडे, डॉ. गायत्री सावजी, विष्णू आव्हाळे, ॲड. वर्षा पालकर, ॲड. अनुराधा वावगे, दिलीप कंकाळ, सावजी शिरसाट, सुधाकर शिरसाट, सोनाली भुतेकर, गणेश इंगळे, आशा बोर्डे, संगिता मोहिते, श्वेता जाधव, पौर्णिमा इंगळे, ॲड. अंजना घोंगडे, छाया अवचार, आरती गायकवाड, आरती इंगळे, ज्योती आढावे, उमेश निकाळे, अभिजीत कांबळे, ओम निकाळे, आत्माराम चव्हाण उपस्थित होते. कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र सोभागे यांनी प्रास्ताविक केले.

00000

मोताळा आयटीआय मधील झेरॉक्स मशिन विक्रीसाठी उपलब्ध

बुलडाणा, दि. 7 : मोताळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील झेरॉक्स मशिन निर्लेखन करण्यात येणार आहे. यासाठी ही मशिन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

आयटीआयमधील पॅनॉसॉनिक एमबी 262 सीएक्स झेरॉक्स मशिन, पॅनॉसॉनिक लाईट ड्युटी कॉपीअर झेरॉक्स मशिन निर्लेखित करण्यात येणार आहे. या कारणास्तव या झेरॉक्स मशीन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी कळविले आहे.

00000


 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

चिखली ते बुलढाणा मॅरेथॉन

बुलडाणा, दि. 7 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुलढाणा जिल्हा न्यायालय येथील धावपटू गजानन पाटील आणि सुरेश शिंबरे यांनी चिखली ते बुलढाणा मॅरेथॉन धावण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

मॅरेथॉन कार्यक्रमास चिखली येथील दिवाणी न्यायाधीश यांनी हिरवी झेंडी दाखवली. या मॅरेथॉनचा जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात समारोप झाला. सदर मॅरेथॉन 22 किमी मध्ये ठिकठिकाणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून स्वागत केले. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल खट्टी यांनी दोन्ही धावपटूंचे स्वागत केले.  प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश  तसेच जिल्हा न्यायाधीश श्री. मेहरे यांनी धावपटूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. भारंबे, एल. डी. सपकाळ, दिनकर पाटील यांनी सहकार्य केले.

00000




मंगळवारपासून कुष्ठरोग शोध अभियान मोहीम

*सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यात मंगळवार, दि. 13 सप्टेंबर पासून कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ही मोहिम‍ दि. 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त रूग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू करावा, तसेच नागरिकांनी या सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती सभा घेण्यात आली.

जिल्ह्यातील 23 लाख 75 हजार 226 लोकसंख्येचे सर्वेक्षण 1 हजार 836 सर्वेपथकामार्फत होणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षण कालावधीमध्ये घरी येणाऱ्या पथकामार्फत क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. सभेत सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

कुष्ठरोगाची लक्षणे ही त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा आणि त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर, तेलकट, चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, हातापायाची बोटे वाकडी असणे, मुंग्या येणे, बधीरता असणे, भुवयाचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, त्वचेवर थंड आणि गरम संवेदना न जाणवणे आहेत.

क्षयरोगाची लक्षणे दोन आठवड्यातून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यातून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकी वाटे रक्त पडणे, मानेवर गाठी आदी लक्षणे आहेत.

सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खिरोडकर, डॉ. प्रशांत तागडे, यास्मीन चौधरी, रामेश्वर बाबल, जिल्हा मलेरीया अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्राचार्य, सोशल सायन्स, नर्सिंग कॉलेज, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. किसन राठोड उपस्थित होते. 

00000

जिल्ह्यातील गणेश उत्सव स्पर्धेच्या मुल्यांकनासाठी समिती

बुलडाणा, दि. 7 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे श्री गणेशोत्सव 2022 अंतर्गत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

या समितीचे अध्यक्ष रोहयो उपजिल्हाधिकारी असतील. सदस्य म्हणून पोलीस उपअधिक्षक, गृह, बुलडाणा, उप-प्रादेशिक अधिकारी, म. प्र. नि. मंडळ, अकोला, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिप बुलडाणा, प्राचार्य, बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालय, खामगांव यांची सदर निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

समिती जिल्ह्यातील गणेशोत्सव उत्सव स्थळी प्रत्यक्ष भेट देईल. व्हीडीओ व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घेतील. ही समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत शासन निर्णयामध्ये नमूद तक्त्यानुसार गुणांकन करुन त्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांच्या संबंधित कागदपत्रे, व्हीडीओ व गुणांकन करुन गुणांकन राज्य समितीकडे दि. 13 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करतील. यास गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

                                                          000000

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी वाहन परवाना देण्यासाठी नियुक्ती

बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन आणि त्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी वाहन परवाना उप प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. 9 सप्टेंबर 2022 पर्यंत या कालावधीमध्ये मिरवणुकीमधील वाहनाची तपासणी करुन परवाना जारी करण्याबाबत तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोवानि अर्चना घनवट, 9623256284, सहा. मोवानि रितेश चौधरी 9158548283, अभिलाष दारवणकर 8149787406 यांची बुलडाणा व चिखली, मोवानि विवेक भंडारे 8600409990, सहा. मोवानि सुरज कोल्हे, 9766967953 यांची लोणार व मेहकर, प्रतिक रोडे 9881158455 देऊळगाव राजा, प्रियंका काळे 7498767213, अभिजित खाडे 8446677743 सिंदखेडराजा, संदीप तायडे 8668891992, मनिषा पंचाळ,8600500128, आशा गवई 8806240276 यांची खामगाव व शेगाव, संदिप पवार 7977889649, भूषण खरतडे 9096452096 मोताळा व नांदुरा स्वप्नील वानखेडे 9260623513 मलकापूर, राजेंद्र  निकम 8329860254, अनुजा काळमेघ 9130781567 जळगाव जामोद, नामुलते ललित 9423908452 यांची संग्रामपूर तालुक्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

                                        0000000

 

No comments:

Post a Comment