Monday 22 August 2022

DIO BULDANA NEWS 19.08.2022

 जिल्ह्यात कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडाचे आयोजन

*तालुकास्तरावर एक दिवसीय कार्यशाळा

बुलडाणा, दि. 19 : जिल्ह्यात कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पंधरवाडा दि. 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान नियोजित केला आहे. यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय एक दिवसीय कार्यशाळा बुलडाणा येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र, धाड रोड, चिखली येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मोताळा येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, मलकापूर येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, खामगाव येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी सभागृह, शेगाव येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह, नांदुरा येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, जळगाव जामोद येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह, संग्रामपूर येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, मेहकर येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय, लोणार येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ पंचायत समिती सभागृह, देऊळगावराजा येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ पंचायत समिती सभागृह, सिंदखेड राजा दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह याप्रमाणे कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

केंद्र सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यात सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिकीकरण करुन सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्याला या पाच वर्षात ६७४ वैयक्तिक उद्योगांचे सक्षमीकरण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. तसेच गट लाभार्थ्यांचे स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्था, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारवयाचे आहेत.

वैयक्तिक सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना सहाय्य घटकांतर्गत सद्या अस्तित्‍वात असणारे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगास विस्तारीकरण आणि स्तरवृद्धीसाठी आणि नविन उद्योगास नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांमध्ये वैयक्तिक मालकी प्रोप्रायटर, भागीदारीसोबतच शेतकरी उत्पादक संस्था, बिगर सरकारी संस्था, सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि प्रायव्हेट लिमीटेड कंपनी यांचाही समावेश केला आहे. बँक कर्जाशी निगडीत भांडवली खर्चापोटी ३५ टक्के अनुदान देय राहणार आहे. यासाठी कमाल अनुदान मर्यादा १० लाख रुपये आहे.

एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक, पात्र आणि सक्षम वैयक्तिक लाभार्थी आणि गट यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रासह जिल्हा संसाधन व्यक्ती, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करून सविस्तर प्रकल्प अहवाल बँकेकडे मंजुरीसाठी सादर करावे. यात नवउद्योजक तरुण, महिला शेतकरी, कृषी प्रक्रिया करणारे उद्योजकां सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वि. रा. बेतीवार यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment