DIO BULDANA NEWS 09.08.2022

 







हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन

बुलडाणा, दि. 9 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिजामाता प्रेक्षागार येथे सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आज पार पडला. राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाचे  आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. यात शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवित हजारो विद्यार्थ्यांनी सामुदायिक राष्ट्रगीत गायन केले.

 सामुदायिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. आज सकाळी 11 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिस बॅण्डसह हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहात एक ताल, एका सुरात राष्ट्रगीत गायन केले.

हातात तिरंगा घेतलेले विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सामिल झाले. प्रेक्षागार येथे येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फी पाईंट उभारण्यात आला. याठिकाणी अनेकांनी सेल्फी काढले.

00000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या