Thursday 18 August 2022

DIO BULDANA NEWS 18.08.2022

 




जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिनाची शपथ

बुलडाणा, दि. 18 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी सद्भावना दिवसानिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांना सद्‌भावनेची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी उपस्थितांना सद्‌भावनेची शपथ दिली. यावेळी यावेळी तहसिलदार शामला खोत, अश्विनी जाधव, नाझर संजय वानखेडे उपस्थित होते. उपस्थितांना सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याची शपथ देण्यात आली.

00000

अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खासगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था, अपंग शाळा व नगर परिषद शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या निर्णयानुसार कागदपत्रांची पूर्तता करुन परिपूर्ण अर्ज, प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावेत करावे लागणार आहे. याबाबत काही शाळांना माहिती होऊ शकली नाही. त्यामुळे वेळेत प्रस्ताव सादर करु शकले नसल्याबाबत संस्थांनी कळविले आहे. अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्याच्या प्रस्तावांची तारीख वाढवून देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शाळा, संस्थांनी केली आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सु. च. लाड यांनी केले आहे. 

000000

बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची बालगृहास भेट

बुलडाणा, दि. 18 : राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संजय सेंगर यांनी येथील शासकीय मुलांचे बालगृह आणि निरीक्षणगृह येथे भेट दिली.

यावेळी श्री. सेंगर यांनी जिल्ह्यातील बालकांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली यंत्रणा बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, सदस्य, महिला आणि बाल अपराध प्रतिबंध कक्षातील पोलिस अधिकारी, चाईल्ड लाईन, सखी वन स्टॉप सेंटर, दत्तक विधान संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी, तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी आणि इतर संबंधित कार्यालये यांचा आढावा घेतला. बालगृहातील बालकांच्या सेवांचा आढावा घेत बालकांना कायमस्वरूपी पालकत्व देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बाल कल्याण समितीच्या तपासणी नियमित भेटी जिल्ह्यातील बालकांच्या संस्थांना देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.

                                                          0000000



बुलढाणा जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचे आगमन

बुलडाणा, दि. 18 : राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या हस्ते यात्रेस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, गटविकास अधिकारी सारिका पवार, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. बचाटे,  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश खुळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. पाटील, कौशल्य विकास व रोजगार अधिकारी प्रमोद खोडे उपस्थित होते. तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाहनाद्वारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 

यात्रेच्या पुढील टप्पात प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबत माहिती, स्थानिक उद्योजक आणि  तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळणार आहेत. प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम दहा कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान, तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येतील. याबाबत अधिक माहिती आणि  सहभागासाठी msins.in किंवा mahastartupyatra.in या वेबसाईटवर भेट द्यावी.

जिल्ह्यातील इच्छुक नवउद्योजकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचे नंदू मेहत्रे मो. क्र. 9975704117, शफीउल्ला सय्यद मो. क्र. 7620378924 आणि गोपाल चव्हाण मो. क्र. 8108868403 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000000

 

No comments:

Post a Comment