Friday 8 July 2022

 



‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविताना नियमांचे पालन करावे

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

बुलडाणा, दि. 8 : प्रत्येक नागरिकाच्या मानात देशभावना विकसित करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत येत्या काळात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविताना ध्वज संहितेमधील नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यातील हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव या उपक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, गेल्या वर्षाभरापासून संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा हे उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरामध्ये देशाभिमान जागविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे संघटन करण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा. शासकीय कार्यालयांनी त्यांना राबवावयाच्या उपक्रमांचे नियोजन करावे.

गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून राज्य हे या अभियानात अग्रेसर आहे. येत्या काळात हर घर तिरंगा हा उपक्रम दि. 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास, शिक्षण आदी विभागांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरावर झेंडा लावण्यासाठी 5 लाखांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झेंडे उपलब्ध व्हावेत, यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने नियोजन करावे. तसेच जिल्हा आणि तालुकास्तरावर 75 फुट उंच झेंडा उभारण्याचे निर्देश आहेत. हा उपक्रम राबविताना ध्वज संहितेमध्ये दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

          हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, प्रदर्शने, विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागांनी नियोजन करून सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले.

0000

 

शासकीय अध्यापक महाविद्यालयात तासिका तत्वावर नियुक्ती

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : येथील शासकीय अध्यापक माहाविद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासकीय अध्यापक माहाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक, विषय-गणित व विज्ञान, पद संख्या 2, शैक्षणिक अर्हता-एम.एससी, एम. एड, नेट, सेट, पीएच. डी. असणाऱ्यांना प्राधान्य असून मुलाखत दि. 12 जुलै 2022 सकाळी 11 ते 2. परिपेक्ष शिक्षणामध्ये परिपेक्ष शिक्षण - पद संख्या 2, शैक्षणिक अर्हता - एम.ए, एम.एड्., मुलाखत 12 जुलै 2022 दुपारी 2 ते 5, ग्रंथपाल वर्ग-3 - ग्रंथालयशास्त्र, पद संख्या 1, बी. लीब., एम. बी, मुलाखत 14 जुलै 2022 सकाळी 11 ते 2, आरोग्य आणि शारिरीक शिक्षण - आरोग्य आणि शारिरीक शिक्षण, पद संख्या 1, शैक्षणिक अर्हता - एम. पी. एड्., मुलाखत 14 जुलै 2022 रोजी दुपारी 2 ते 5, उपयोजित कला - विषय - उपयोजित कला - पद संख्या 1, शैक्षणिक अर्हता - एम. एफ. ए., मुलाखत दि. 15 जुलै 2022 सकाळी 11 ते 2, ललित कला शिक्षक – विषय - द्रुक कला, पद संख्या 1, शैक्षणिक अर्हता - एम.एफ.ए. मुलाखत दिनांक 15 जुलै 2022 दुपारी 2 ते 5 या वेळेत मुलाखती घेण्यात येतील.

इच्छुक उमेदवारांनी संपुर्ण माहितीसह अर्ज आणि आवश्यक मुळ कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायाप्रतिसह वेळापत्रकानुसार स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. सदर घड्याळी तासिकातत्वावरील नियुक्ती ही शैक्षणिक सत्र 2022-23 साठी राहिल. सदर पदांना शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतरच मानधन देय होईल. घड्याळी तासिकेचे मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहील. अर्जाचा नमुना www.gcebedbuldan.org.in या संकेतस्थाळावर उपलब्ध आहे, असे  शासकीय अध्यापक माहाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा लिंगायत यांनी केले आहे.

                                                            *******

शिक्षणाचा अधिकारातील तिसऱ्या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2022-23 या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सद्यास्थितीत सुरु असून प्रवेश यादीतील पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाली असून तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या दि. 4 जुलै 2022 रोजी सुचनेनुसार प्रतिक्षा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या टप्प्यात दि. 13 जुलै 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येतील. तिसऱ्या टप्प्यातील प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ॲलोटमेंट लेटरची प्रिंट काढून, विहित मुदतीत तालुकास्तरावरील कागपदत्रे पडताळणी समिती केंद्रावर सादर करून प्रवेश निश्चित करुन घ्यावे. जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक आणि तालुकास्तरावतील संबंधित यंत्रणांनी नोंद घेवून, अधिकाधिक बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                           **********

शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 17 मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहांमध्ये सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संबंधित वसतीगृहांवर अर्ज वाटप सुरु झाले आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत शालेय वर्गासाठी दि. 15 जुलै 2022 पर्यंत असून इयत्ता दहावी व अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि. 30 जुलै 2022 पर्यंत, तर बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे लागणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना वसतीगृहातील प्रवेशासाठी संबंधित वसतीगृहाच्या ठिकाणी अर्ज भरुन सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

*********

जिल्हास्तरावर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : जिल्हास्तरावरील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा दि.  19 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धांचे आयोजन 14 वर्षाआतील मुले दि. 19 ते 20 जुलै 2022 (सब ज्युनिअर), 17 वर्षाबातील मुले (ज्युनिअर) दि. 20 ते 21 जुलै 2022, 17 वर्षाआतील मुली (ज्युनिअर) दि. 21 ते 22 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरिता सबज्युनिअर (14 वर्षाआतील) क्रीडा स्पर्धा मुले वयोगट 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असावेत.

          सर्व संघानी स्पर्धेत सहभागापुर्वीच याwww.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. स्पर्धेत सहभागी हाणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे ऑफलाईन नोंदणी दि. 15 जुलै 2022 पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट फोटो असणे आवश्क आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणर असून, त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा दाखला आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

          प्रवेश अर्जावर खेळाडूंचे संपूर्ण नाव, जन्मतारिख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे  नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर क्रमांक, मोबाईल क्रमांक, स्ंस्था प्रमुख, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने पाठवावे लागणार आहे. 14 वर्षाआतील खेळाडूंकरिता वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

          जिल्ह्यातील शाळा आणि संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

**********

महाविद्यालय समान संधी केंद्र स्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक महाविद्यलायात समान संधी केंद्र सरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी केंद्र स्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा विकास व गुणवता वाढीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. याकरिता प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्र स्थापन करुन केलेल्या उपक्रमाचा अहवाल सादर करावा लागणार आहे. महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शासनाच्या इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यावसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करणे सोयीचे होणार आहे.

संवाद अभियान, युवा संवाद यासाखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता आता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी समान संधी केंद्र स्थापन करण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्देशित केले आहे. यापूर्वी याबाबत महाविद्यालयास वेळोवेळी कळवण्यात आले आहे. मात्र बऱ्याच महाविद्यालयांचे अहवाल अप्राप्त आहेत.

प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी सहाभागी करुन केंद्र स्थापन करावते व तसा अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा. समान संधी केंद्र स्थापन झाल्या नसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यलयाच्या प्राचार्यांवर राहणार आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

**********

भोजन पुरवठादाराकडून निविदाची मागणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : सेंट आरसेंटी येथील स्वयंरोजगार प्रशिक्षणार्थ्यांना भोजन पुरविण्याबाबतची बंद निविदा दि. 14 जुलै 2022 पर्यंत अग्रणी बँक कार्यालयात मागविण्यात आले आहेत.

यासाठी इच्छुक पुरवठादारांनी कार्यालयाला भेट देऊन सेवा शर्तीचे रीतसर पत्र प्राप्त करुन घ्यावे. कार्यालयास बंद निविदा पाठविण्यात यावे. निविदा या संचालक, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अभंग बिल्डिंग, जनशिक्षण संस्थेच्या बाजूला, जांभरुन रोड, बुलडाणा. संपर्क क्रमांक 9763595826, 8421792764 असल्याचे संचालक उत्तम कवाने यांनी कळविले आहे.

*******************

मेहकर येथे लक्झरी बसेसना बायपास मार्गाने जाण्याची सुट

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : मेहकर शहरातून लक्झरी बसेसना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याप्रकारचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयने निर्गमित केले आहेत.

मेहकर शहरातून जाणारे जड वाहने, लक्झरी बस यांना सकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत येण्यास बंदी करुन करण्यात आली आहे. सदर जड वाहनांची वाहतूक ही सारंगपूर बायपास मेहकर या पर्यायी मार्गाने पुढील आदेशापर्यंत वळविण्यात आली होती. सदर आदेशामधून लक्झरी बसेसना सूट देण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment