Thursday 7 April 2022

DIO BULDANA NEWS 7.4.2022

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कासाठी अर्ज सादर करावे

  • 20 एप्रिल 2022 अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारा बाबतचा शासन निर्णय 8 मार्च 2019 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयान्वये वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यायत्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी, इतरांना प्रेरणा मिळावी, तसेच समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावे, याकरीता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी 20 एप्रिल 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे शासनाचे पत्र 22 जुलै 2019 अन्वये विहीत नमुन्यामध्ये रितसर अर्ज सादर करावा.

  सदर पुरस्कार सन 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22 या चार वर्षाचा एकत्रित देण्यात येणार असल्याने इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी सदर चार वर्षासाठी चार वेगवगळे रितसर अर्ज सादर करावे.  तरी इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी सन 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22 अशा चार वर्षांसाठी वेगवेगळा रितसर अर्ज करावयाचा आहे.  पुरस्कासाबाबत नियमावली 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये जोडण्यात आली असून शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छूकांनी 20 एप्रिल पर्यंत रितसर अर्ज आवश्यक त्या माहितीसह सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                        ********

कोरोना अलर्ट : प्राप्त 171 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 7:  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 172 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 171 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड चाचणीमधील अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 33 तर रॅपिड टेस्टमधील 138 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 171 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : लोणार तालुका : देऊळगांव कुंडपाळ 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 1 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 808015 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98314 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98314 आहे.  आज रोजी 18 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 808015 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99003 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98314 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला एक रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**********

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या 100 टक्के निधीचा विनीयोग

बुलडाणा, (जिमाका) दि. 7:  आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत या आर्थिक वर्षात प्रती आमदार 4 कोटी रूपये इतका अनुज्ञेय निधी शासन निर्णया प्रमाणे प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात मागच्या वर्षीचे दायीत्व वजा जाता उर्वरीत अनुज्ञेय रक्कमेच्या 100 टक्के निधीच्या  प्रशासकिय मान्यता दिलेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांनी आपल्या मतदार संघात 100 टक्के प्रमाणे निधीच्या मर्यादेत प्रशासकिय मान्यता देऊन निधीचा विनियोग केलेला आहे. त्यात प्रामुख्याने रस्ता कामे, सभामंडप कामे, नाली बांधकामे घेण्यात आलेली आहेत, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        

No comments:

Post a Comment