Monday 18 April 2022

DIO BULDANA NEWS 18.4.2022

 

                     मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणी करावी

• 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदत, जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी व बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 16 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नाव नोंदण्याकरीता 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

   जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, खामगांव, लोणार, मेहकर, संग्रामपूर, मलकापूर, जळगांव जामोद व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, माँ जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र वडी ता. नांदुरा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी मोताळा, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी मलकापूर या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, जनधन योजनेचे बँक खाते असल्यास देण्यात येवू नये, चालु वर्षाच सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. केंद्रावर शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रथम नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

*****

विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण

व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन 

         बुलडाणा, (जिमाका) दि. 18 :  जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे या हेतूने खेळाच्या प्रचार व प्रसाराकरीता तसेच खेळाडूमधील खेळ कौशल्य, शारीरिक क्षमता, सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी,  आवड निर्माण करण्यासाठी वयोगट 8 ते 14 या वयोगटातील विद्यार्थी खेळाडूंसाठी उन्हाळी प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत तसेच जिल्ह्यातील विविध एकविध खेळ संघटना यांचे संयुक्त विद्यमाने खेळाचे प्राथमिक कौशल्य उन्हाळी प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीर होणार आहे. सदर शिबिर 22 एप्रिल ते 12 मे 2022 या कालावधीत सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 5.30 ते 7.30 या सत्रामध्ये जिल्हा क्रीडा संकुल, जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल बुलडाणा, तालुका क्रीडा संकुल, धाड नाका, शेरीवेल व एडेड हायस्कुलचे मैदान, बुलडाणा येथे करण्यात येत आहे.

          सदर प्रशिक्षण शिबीरामध्ये मैदानी खेळ, आर्चरी, हॅण्डबॉल, कबड्डी, खो खो, जिम्नॅस्टीक, फुटबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कराटे आदी खेळांचे आधुनिक व तंत्रशुध्द पध्दतीने मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक तसेच जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, एकविध खेळ संघटनेचे तज्ञ मार्गदर्शक करतील.

            यासाठी 8 ते 17 वयोगटातील विद्यार्थी खेळाडू (मुले/मुली) सहभागी होवू शकणार आहे. प्रथम प्राधान्य वयोगट 8 ते 14 वर्ष मुले/मुली राहील. या शिबीरातून खेळाडूंचा सहभाग, खेळाडूंची आवड, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होण्यास मदत होवून शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळणार आहे.

            तसेच व्यक्तिमत्व विकास शिबीराअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान, चित्रकला, योगा, एरोबिक्स, लाठीकाठी, स्वयंसिध्दा, सर्पमित्र, दंतचिकीत्सा, जंगल सफारी (ट्रॅकींग), खेळ दुखापत व प्रथमोपचार, आहार विषयक माहिती, कारडीओ अरेस्ट आदी बाबत तज्ञ मार्गदर्शकांमार्फत माहिती देण्यात येईल.

            सदर शिबीरामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येणार असून, नियमित उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंना कार्यालयामार्फत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे  यांच्या 9970071172 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच प्रशिक्षण शिबीराची उपस्थिती दि.22.04.2022 रोजी सायंकाळी 5 वा. जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड बुलडाणा येथे राहील. सदर प्रशिक्षण शिबीरामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

                                                                                                *********

 

 

No comments:

Post a Comment