Tuesday 12 April 2022

DIO BULDANA NEWS 12.4.22

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 43 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 12:  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 43 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 42 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड चाचणीमधील अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 11 तर रॅपिड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 42 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : नांद्री 1, अशाप्रकारे जिल्ह्यात 1 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 808381 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98314 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98314 आहे.  आज रोजी 13 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 808381 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99004 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98314 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला दोन रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**********

बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांसाठी सफाईगार पदाची कामे मिळणार

• 18  एप्रिल 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा येथे कंत्राटी पद्धतीचे 1 सफाईगार पद रिक्त आहे. या पदासाठी नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटपाकरीता कामे प्राप्त झाली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सफाईगार पदाची कामे करुन घेणे गरजेचे आहे. सफाईगार पदांची कामे बेरोजगार सोसायटयांकडून ठेका पध्दतीने करुन घ्यावयाची आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत सुशिक्षीत बेरोजगारांच्या कार्यरत सेवा सहकारी सोसायट्या आहेत. नोंदणीकृत सेवा सहकारी संस्था सफाईगार पदासाठी काम करण्यास इच्छूक असल्यास प्राथमिक छाननी करीता प्रस्ताव 18 एप्रिल 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस स्टॅंड समोर, बुलडाणा येथे सादर करावा.

   सदर संस्था ही ऑगस्ट 2000 नंतरची सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी, सदर कामासाठी सेवा सहकारी संस्था इच्छुक व पात्र असावी, तशी लेखी सहमती कळवावी. सेवा सहकारी संस्थेचे राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत खाते असावे, मागील आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण केलेले असावे, समितीमार्फत काम मिळविण्यासाठी सहकारी सेवा सोसायटी अथवा लेाकसेवा केंद्र किमान 6 महिने कार्यरत असावे. त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे. सेवा सहकारी संस्थेमधील सदस्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जासोबत अंकेक्षण अहवाल, नोंदणी प्रमाणपत्र प्रत, संस्थेच्या अनुभवाची कागदपत्रे, बँकेच्या पासबुकाची प्रत सोबत जोडावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                            **********

 

 

 

 

रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदीकरिता

पोर्टलद्वारे नोंदणी  करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत

        बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि.11 ते दि. 30 एप्रिल 2022  या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

          राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे, ते दि. 30 जून, 2022 असा कालावधी  ठेवण्यात आला आहे. तसेच भरडधान्य खरेदीकरिता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत.पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते दि. 30 एप्रिल 2022  या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत  देण्यात आली आहे.     

                                                ********        

 

No comments:

Post a Comment