Friday 1 April 2022

DIO BULDANA NEWS 1.4.2022


 जागर करियरचा…जागर उद्योजकतेचा…!

  • एकनाथ दौंड यांची दुग्ध व्यवसायातून समृद्धी
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा घेतला लाभ

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ चा बोर्ड गावात लावताना बघीतला. अन् पटकन मनात विचार आला. या महामंडळाच्या योजनांचा लाभ आपणाला कधी मिळेल.  हा विचार घेवून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयकांना योजनेच्या लाभाबाबत विचारणा करण्यात आली.  अण्णासाहेब  पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जिल्हा समन्वयकांद्वारा विचारणा करणाऱ्या व्यक्तीची व्यवसाय करण्याची इच्छा जाणून घेवून त्यांच्याकडून सर्व अटी व पात्रता पुर्ण करण्यात आल्या. त्यानंतर सदर व्यक्तीला 10 लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ती व्यक्ती आज दुग्धव्यवसायातून आर्थिक उन्नती साधत आहे.  या व्यक्तीचे नाव  एकनाथ श्यामराव दौंड असून धाड, ता. जि बुलडाणा येथील रहीवासी आहे.

   एकनाथ दौंड यांना आधीपासूनच दूग्धव्यवसायाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी सदर योजनेतून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी 12 होस्टन जर्सीमधील गायी घेतल्या, अन व्यवसाय सुरू केला. आजरोजी त्यांच्याकडे 30 गायी व बरेच छोटे वासरे आहे.  रोज कमीत कमी 500 लीटर दूधाचे उत्पादन घेतले जात आहे. आता दुग्धव्यवसाय हा मुख्यव्यवसाय होवून शेती व्यवसायाला पुरक व्यवसाय बनला आहे. ते आपल्या या यशाचे श्रेय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि चिखली अर्बन को.ऑपरेटीव्ह बॅंकेला देतात. खूप जास्त शिक्षण नसले तरी चालेल.. मातीशी नाळा जुळता आले की घाले. तसेच प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली की…कोणत्याही व्यवसायात अपयश येत नाही. हा मोलाचा आणि स्वानुभावाचा सल्ला ते आजच्या तरुणांना देतात. तसेच शासकीय योजना फक्त बोर्डवर लावण्यासाठीच नसून स्व-उन्नती साठी असतात. याचे साक्षीदार ते स्वतः असल्याचे सांगतात, असे कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

                                                            **********

सफाई कामगार व पहारेकरी पदासाठी निविदा आमंत्रित

• 13 एप्रिल सादर करण्याची अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : शासकीय अध्यापक महाविद्यालयाकरीता आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1 मे 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीकरीता सफाई कामगार व रात्रपाळी पहारेकरी पद भरावयाची आहे. प्रत्येकी एक याप्रमाणे दोन पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याकरीता विहीत आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार अथवा पंजीकृत बेरोजगार सेवा सहकारी संस्था, लोकसेचा केंद्राकडून द्विलिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल 500 रूपये भरणा करून 6 ते 8 एप्रिल 2022 पर्यंत सकाळी 11 ते सायं 5 वाजेदरम्यान मिळू शकणार आहे. तसेच 13 एप्रिल 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्वीकारण्यात येणार आहे. मोहोरबंद निविदा 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येतील. यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्यांचे राहील. सदर निविदा महाविद्यालयाच्या www.gcebedbuldana.org.in या संकेतस्थळावर पहावी, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस लिंगायत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        *********  


जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध मागे

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : जिल्ह्यातील कोविड 19 या साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेले सर्व प्रकारचे निर्बंध मागे घेण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कोविड 19 चे निर्बंधाचे अनुषंगाने लागू करण्यात आलेले सर्व आदेश 1 एप्रिल 2022 चे रात्री 12 वाजेपासून अंमलात राहणार नाहीत. कोविड 19 च्या अनुषंगाने यापुढे कुठलेही निर्बंध लागू राहणार नाहीत. कोविड 19 च्या अनुषंगाने निर्बंध मागे घेण्यात आले असले तरीही सामाजिक आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्व नागरिक, आस्थापना व संस्थांना मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आदींसह कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करणे सुरू ठेवावे. कोविड च्या अनुषंगाने लसीकरणासाठी पात्र नागरिकांसाठभ्‍ लसीकरण मोहिम सुरू राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                                **************

No comments:

Post a Comment