Sunday 6 March 2022

DIO BULDANA NEWS 6.3.2022

 


संग्रामपूर शहर विकासाची  'ब्ल्यू प्रिंट' तयार करा

- बच्चू कडू
* संग्रामपूर नगर पंचायत बैठक
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : संग्रामपूर शहर विकासाला मोठा वाव आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी मोठे काम करावयाचे आहे. शहरात रस्ते, नाल्या, शाळा, आरोग्याची सुविधा, घरकुल तसेच पाणी पुरवठा याबाबत समीक्षा करून विकास करावा लागणार आहे. त्यासाठी संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करावी, अशा सूचना जलसंपदा, महिला व बालविकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज संग्रामपूर येथे दिल्या. संग्रामपूर नगर पंचायत सभागृहात शहर विकासासाठी विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते. 
   यावेळी नगराध्यक्ष उषा सोनोने, उपाध्यक्ष संतोष सावतकर, उपविभागीय महसुल अधिकारी वैशाली देवकर, नगर प्रशासन विभागाचे श्री. अकोटकर, तहसीलदार श्री. वरणगावकर,  मुख्याधिकारी प्रशांत शेळके, कार्यालय अधिक्षक शरद कोल्हे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. 
   नगर पंचायत येथील उर्दू शाळा मराठी शाळेच्या इमारतीत प्राधान्याने स्थलांतरित करण्याच्या सूचना देत राज्यमंत्री श्री कडू म्हणाले, शाळा स्थलांतर तातडीने करावे. जेणेकरून शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच शहरात  पिण्याचे पाणी आठवड्यातुन १ दिवशी मिळत असल्याने २४ तासांवर कशे देता येईल याबाबत नियोजन करावे. शहरातील रस्त्यांची कामे करावी. घरकुल योजना प्रभावी पणे राबवून गरजू लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. 
   याप्रसंगी जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी,  नगर पंचायत सर्व विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थीत होते. 
*****
जिल्हास्तरीय युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणा व्दारा  आजादि का अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 07 मार्च 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता गर्दे वाचनालय सभागृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते, जि. प. अध्यक्ष सौ.मनिषा पवार यांच्या  अध्यक्षतेखाली तर जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जालींधर बुधवत यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न होत आहे.  युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने नृत्य व समूह गीत, लोकगीत, पारंपारीक लोककला, अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी  करण्यात येणार आहे.  त्याच प्रमाणे कॅच द रेन, प्लास्टीक निर्मुलन व  मतदार जागृती या विषयावर चित्रकला स्पर्धेत आयोजित  घेण्यात आली आहे. या स्पर्धेतील चित्रांची चित्रप्रदर्शनी सकाळी 11 ते 3 या वेळेत गर्दे वाचनालय, बुलडाणा येथे लावण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचा लाभ युवक-युवती तसेच नागरीकांनी घ्यावा असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment