Posts

Showing posts from October, 2021

DIO BULDANA NEWS 30.10.2021

  कर्ज मेळाव्यात 1846 खातेदारांना 60.92 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर * बुलडाणा येथे कर्ज मेळावा उत्साहात  बुलडाणा, (जिमाका) दि. ३०: वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार देशामध्ये 7 ते 30 ऑक्टोंबर 21 पर्यंत क्रेडिट आऊट रिच अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी स्थानिक  गर्दे हॉल मध्ये दुपारी 12 वाजता कर्ज मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.  कर्ज मेळाव्यात अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती होते, तर आमदार संजय गायकवाड,  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगले उपस्थित होते. या कर्ज मेळावामध्ये सर्व बँकांनी मिळून 1846 खातेदारांना 60 कोटी 92 लक्ष 46 हजार 870 रूपये एवढे कर्ज मंजूर करण्यात आले.   अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या पुढाकराने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन ...

DIO BULDANA NEWS 29.10.2021

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 313 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह   ·           1 रूग्णाला मिळाली सुट्टी      बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 314 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 313 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 70 तर रॅपिड टेस्टमधील 243 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 313 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                               ...

DIO BULDANA NEWS 28.10.2021

  कोरोना अलर्ट : प्राप्त 234 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह          बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 235 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 234 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 44 तर रॅपिड टेस्टमधील 190 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 234 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                              ...

DIO BULDANA NEWS 27.10.2021

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 500 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह        •       2 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                             बुलडाणा, (जिमाका) दि. 27 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 501 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 500 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 131 तर रॅपिड टेस्टमधील 369 अहवालांचा समावेश आहे. अ...

DIO BULDANA NEWS 26.10.2021

  कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 05 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :   पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 18 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 05 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.    प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 326 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 326 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपिड टेस्टमधील 263 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 326 अहवाल निगेटीव्ह आहेत.   त्याचप्रमाणे आजपर्यंत 729630 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86928 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्या...

DIO BULDANA NEWS 25.10.2021

Image
    राज्य निपुणता केंद्रातर्गत सायकलिंग खेळाच्या प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन बुलडाणा,  (जिमाका) दि. 25 :   आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जा खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांचा शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविध पुरविुन त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.    क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.    क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडीया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत.    यानुसार ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. सायकलींग या खेळाबाबतची निवड चाचणी तज्ञ समितीमार्फत समक्ष गुणानुक्रमे देऊन प्रवेश निश्चीत केली जाणार आहे.    सायकलींग या खेळाच्या प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा मार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन दि.29...