Tuesday 2 March 2021

DIO BULDANA NEWS 2.3.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2739 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 427 पॉझिटिव्ह

  • 354 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.2: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3166 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2739 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 427 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 316 व रॅपीड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1912 तर रॅपिड टेस्टमधील 827 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2739 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 47, बुलडाणा तालुका : हतेडी 1, दुधा 3, सुंदरखेड 3, केसापूर 1, गिरडा 6, पिं. सराई 1, वरवंड 4, रायपूर 1, सागवन 3, शिरपूर 1, चिखली तालुका : भालगांव 2, शेलगांव 1, हिवरा गडलिंग 1, सवणा 1, उत्रादा 1, केळवद 1, सावरगांव डुकरे 8, वळती 1, सोमठाणा 2, खैरव 1,कोलारा 2,अमडापूर 1, शेलसूर 1, किन्होळा 2,  चिखली शहर : 34, सिं. राजा शहर : 9, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 4, पांगरी उगले 1, रताळी 3, मोताळा तालुका : राजूर 1, बोराखेडी 5, गोतमारा 1, पान्हेरा 4, वरूड 2, धा. बढे 2, खरबडी 1, कोथळी 1, खामगांव शहर : 55, खामगांव तालुका : आडगांव 4, घाटपुरी 4, सुटाळा बु 1, गवंढळा 3, अंत्रज 9, माळेगांव 1, कुंबेफळ 1, दे. राजा शहर : 28, दे. राजा तालुका : दे. मही 2, भिवगांव 1, सिनगांव जहागीर 2, उंबरखेड 2, वाघजई 1,किन्ही पवार 1, अंढेरा 1, बायगांव 1, सावंगी टेाकळे 2, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : जानेफळ 1,मलकापूर शहर : 24, नांदुरा शहर : 21, नांदुरा तालुका : वडनेर 3, टाकरखेड 1, जवळा बाजार 17, नारखेड 1, येरळी 1,  लोणार तालुका : आरडव 1, खंडाळा 3, लोणार शहर : 1, जळगांव जामोद तालुका : मानेगाव 7, खांडवी 4, धानोरा 1,  पिं. काळे 2,  झाडेगांव 5, आसलगांव 2, चावरा 1, जळगांव जामोद शहर : 4, शेगांव शहर : 18, शेगांव तालुका : भोनगांव 2, खेर्डा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 7, वरवट बकाल 1, बावनबीर 1, टुनकी 1, संग्रामपूर शहर : 2, मूळ पत्ता पळसखेड ता. जामनेर 1, जाळीचा देव ता. भोकरदन 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 427 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 354 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 38,  बुलडाणा : अपंग विद्यालय 22, सहयोग हॉस्पीटल 4,  दे. राजा : 39, लोणार : 38, चिखली : 44,  नांदुरा : 20, सिं. राजा : 8, मोताळा : 12, मलकापूर : 35, जळगांव जामोद : 20, शेगांव : 45, मेहकर : 20,   

   तसेच आजपर्यंत 140008 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16418 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 16418 आहे. 

  आज रोजी 8669 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 140008 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19213 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 16418 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 2601 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 194 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****      

 

कॅच द रेन अभियान जनजागृती पोस्टर्सचे विमोचन

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन  जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याहस्ते 26 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे करण्यात आले. या प्रसंगी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजयसिंग राजपूत व क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जतन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री. डागर यांनी यावेळी सांगितले.     

*********

अनुकंपा अर्जदारांची यादी प्रसिद्ध; लेखी आक्षेप असल्यास नोंदवावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : अनुकंपा धारकांचे तात्पुरत्या यादीवर उमेदवारांकडून लेखी आक्षेप मागविण्यात आले होते. सन 2020-21 ची अनुकंपाधारक उमेदवारांचे प्राप्त अर्जांची अंतिम सुधारित यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीवर काही आक्षेप असल्यास उमेदवारांना 20 दिवसांपर्यंत लेखी आक्षेप नोंदविता येतील. विहीत केलेल्या कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास आक्षेप नाही, असे समजण्यात येईल. याची संबंधीत यादीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कळविले आहे.

 

*******

No comments:

Post a Comment