Monday 15 March 2021

DIO BULDANA NEWS 15.3.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 1560 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 533 पॉझिटिव्ह 462 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.15: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2093 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1560 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 533 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 407 व रॅपीड टेस्टमधील 126 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 456 तर रॅपिड टेस्टमधील 1104 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1560 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 95, मलकापूर तालुका : जांबुळधाबा 1, वडोदा 1, वरखेड 1, निमखेड 1, विवरा 3, भाडगणी 1, आळंद 11, कुंड बु 16, देवधाबा 11, बुलडाणा शहर : 86, बुलडाणा तालुका : गोंधनखेड 1, धाड 2, मासरूळ 2, डोंगरखंडाळा 1, साखळी बु 1, उमाळा 3, नांद्राकोळी 3, रूईखेड टेकाळे 1, पोखरी 3, चिखली शहर : 22, चिखली तालुका : केळवद 1, शेलसूर 1, शेलूद 2, पेठ 1, करवंड 1, हातणी 2, टाकरखेड 1, इसरूळ 1, सवणा 1, किन्होळा 3, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, शेगांव शहर : 58, शेगांव तालुका : जवळा 5, माटरगांव 1, जलंब 8, गौलखेड 1, झाडेगांव 1, लासुरा 1, खामगांव शहर : 73, खामगांव तालुका : पिंप्री कोरडे 1, लाखनवाडा 1, शिर्ला नेमाने 1, हिवरखेड 2, टेंभुर्णा 1, अंत्रज 2, पोरज 4, घाटपुरी 3, पळशी 3, अटाळी 1, चिंचपूर 4, गणेशपूर 1, धामणगांव दे 1, संग्रामपूर तालुका : उकडगांव 1, पातुर्डा 2, सोनाळा 2, वरवट बकाल 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : भानखेडा 2, पळसखेडा 2, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : दाभाडी 3, शेलापूर 2, राजूर 7, कोथळी 1, नांदुरा तालुका : शिरसोळी 2, जिगांव 1, निमगांव 1, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, दे. राजा तालुका : अंढेरा 1, दगडवाडी 1, सुरा 1, सिनगांव जहा 2, दे. राजा शहर : 6, सिं. राजा तालुका : गुंज 1, वसंत नगर 5, शिवणी टाका 2, चिंचोली 1, निमागांव 1, सिं. राजा शहर : 4, मूळ पत्ता वैभव नगर, धुळे 1, मंठा जि जालना 1, अकोला 1, रिसोड जि वाशिम 1, पारंबी ता. मुक्ताईनगर जि जळगांव 1, इंचा ता. मंठा जि जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 579 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान केशव नगर, बुलडाणा येथील 67 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 462 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 127, खामगांव : 42, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 6, सहयोग हॉस्पीटल 3, कोविड रूग्णालय 21, मुलींचे वसतीगृह 2, अपंग विद्यालय 44, दे. राजा : 39, मेहकर : 1, जळगांव जामोद : 12, सिं. राजा : 26, नांदुरा : 12, मलकापूर : 44, शेगांव : 40, मोताळा : 26, संग्रामपूर : 6, लोणार : 11, तसेच आजपर्यंत 160592 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 21865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 21865 आहे. आज रोजी 2841 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 160592 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 25663 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 21865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3578 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 220 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** कोविडच्या नियंत्रणासाठी ‘मी जबाबदार’ अभियानात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी जिल्हा कार्यक्रम सल्लगार समितीची सभा बुलडाणा,(जिमाका) दि.15: सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोविड विरूद्ध लढण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे, सोशल डिस्टसिंग पाळणे या त्रि सुत्रींचा उपयोग करावा. त्यासाठी राज्य शासनाने मी जबाबदार अभियान हाती घेतले आहे. या अभियानात सहभागी होत सर्वांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा आज 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री गीते, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवथापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक सुनिल पाटील, भारत स्काऊट जिल्हा संघटक सुभाष आठवले, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानोबा कांदे, जिल्हा आरोग्य विभागाचे ए.सि.शिरसाट, जिल्हा क्रीडा कार्यालयातील सुरेशचंद्र मोरे, जिल्हा कौशल्य विकास विभागातील एन.ई.पडघान, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखा व कार्यक्रम सहाय्यक अजयसिंग राजपूत व स्वयंसेवक सपना मोरे हे उपस्थित होते. या सभेत वर्ष 2020-21 मधील आयोजित कार्यक्रमाची माहिती जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी दिली. तसेच कोविड-19, कॅच द रेन आणि ग्रीन व्हीलेज-क्लीन व्हीलेज जनजागृती अभियान पथनाटयाच्या माध्यमातून जिल्हयात आयोजित केले असल्याचे सांगितले. शेवटी सर्व उपस्थितांचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी आभार मानले. ******** वयोवृद्ध सन्मान पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित बुलडाणा,(जिमाका) दि.15: दरवर्षी 1 ऑक्टोंबर रोजी जागतिक वृद्ध नागरिक दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने केंद्र शासनाकडून 1 ऑक्टोंबर 2021 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने वयोवृद्धांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी केंद्र शासनाच्या 10 फेब्रुवारी 2021 मधील पत्रात नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती व संस्था यांनी त्वरित पात्र व्यक्ती, संस्था यांचे प्रस्ताव इंग्रजीमध्ये टंकलिखीत करून सॉफ्ट कॉपीसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयास 4 प्रतीत सादर करावे. अधिक माहितीकरीता समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन डॉ अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. ********* पीककर्ज 31 मार्च 2021 पर्यंत भरणाऱ्या कर्जदार सभासदांना तात्काळ कर्जवाटप जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा उपक्रम बुलडाणा,(जिमाका) दि.15: दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला संलग्न ग्रामसेवा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार सभासदांनी 31 मार्च 2021 पर्यंत त्यांच्याकडील पीककर्ज, थकीत कर्जाचा भरणा करावा. अशा कर्जदार सभासदांना तात्काळ माहे एप्रिल 2021 पासून वाढीव पीक कर्जदराने नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी संलग्न ग्रामसेवा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार सभासदांनी 31 मार्च 2021 पर्यंत नियमित व थकीत कर्जाचा भरणा करून नव्याने वाढीव पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खरात यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment