Wednesday 31 March 2021

DIO BULDANA NEWS 31.3.2021

 


पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि.31 : जिल्ह्यातील शहीद जवान प्रदीप साहेबराव मांदळे (युनिट 10 महार रेजिमेंट) रा. पळसखेड चक्का, पो सावखेड तेजन ता. सिं. राजा  हे देशातंर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन रक्षक मोहिमे अंतर्गत नियंत्रण रेषेजवळ द्रास सेक्टर येथील ऑपरेशन एरियामध्ये हिमस्खलनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे 15 डिसेंबर 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानच्या कुटूंबियांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया,  सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती कांचन प्रदीप मांदळे, वीरमाता श्रीमती सुनंदा साहेबराव मांदळे यांना 40 लक्ष  रूपयांचा धनादेश देण्यात आला. 

                                                                                    **********

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 3923 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 630 पॉझिटिव्ह

• 886 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4553 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3923 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 630 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 366 व रॅपीड टेस्टमधील 264 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 387 तर रॅपिड टेस्टमधील 3536 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3923 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 65, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2,  रायपूर 1, डोंगरखंडाळा 1, पाडळी 2,  सागवन 3, येळगांव 1, देऊळघाट 1,    खामगांव शहर : 65, खामगांव तालुका : सज्जनपूरी 3, पिं. राजा 6, हिंगणा 1,  पिंप्री कोरडे 4, गणेशपूर 1, शिरसगांव दे 1, जळका 2, राहुड 1, पळशी 1, आमसरी 3, आडगांव 1, टेंभुर्णा 1,  घाटपुरी 9, पारखेड 1, ढोरपगांव 2, बोरजवळा 1,   सुटाळा 7, गोंधनपूर 1, शेगांव शहर : 8,   शेगांव तालुका : गव्हाण 1, पहुरजिरा 1, जळगांव जामोद शहर : 11, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 5, काजेगांव 3, सावरगांव 13, खेर्डा बु 7, रूधाना 1, जामोद 1, आसलगांव 5, वाडी खु 2,  पिं. काळे 1,  सुलज 2,  उटी खु 43, धानोरा 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : काटेल 8, खिरोडा 1, रोहणा 1, टुनकी 1, पातुर्डा 1, वरवट 3, काकडेश्वर 1, कोलद 1, एकलारा 1, सायखेड 1, बोरखेड 1, बावनबीर 1, सगोडा 1, सोनाळा 3,  उकडगा 1, कथरगांव 1, मनार्डी 1, असोदा 1, काकनवाडा 1, बोडखा 1, वानखेड 2, चिखली शहर : 21,  चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 2, अमडापूर 1, सवणा 1, एकलारा 3, मुरादपूर 1, खैरव 1, मालखेड 2, गांगलगाव 1, चंदनपूर 1, शेलगांव आटोळ 1, करवंड 1, माळविहीर 1,     

   मोताळा शहर : 4,  मोताळा तालुका : सांगळद 2, रोहीणखेड 1,  अंत्री 1, बोराखेडी 4, पोफळी 1,  काबरखेड 2, कोथळी 4, खरबडी 1, आव्हा 2, धामणगांव दे. 2, परडा 3, शिरवा 1,   धा. बढे 2,  शेलापूर 3, पिंप्री गवळी 2,   मेहकर शहर : 12, मेहकर तालुका : अंजनी खु 1, अंत्री देशमुख 1, डोणगांव 2, लव्हाळा 1,  लोणी गवळी 1, उकळी 1,   नांदुरा शहर : 10,  नांदुरा तालुका : निमगांव 2,  सावरगांव 5, अवधा 2,  खुमगांव 8, नवीन येरळी 1,  वडाळी 1,  धाडी खु 1,  भोरवट 1, पातोंडा 1, चांदुर बिस्वा 1, खैरा 1, टाकरखेड 1,   मलकापूर शहर : 28, मलकापूर तालुका : दसरखेड 19, धरणगांव 1, कुंड बु 6, दुधलगांव 1, दाताळा 1, पिंपळखुटा 1, घिर्णी 1, नरवेल 5, विवरा 2,   दे. राजा शहर : 33,  दे. राजा तालुका : गारखेडा 1, असोला जहा 1,  जांभोरा 2, चिंचाली बु 1, सावखेड भोई 2, तुळजापूर 1, टाकरखेड भागीले 1, गिरोली खु 1,  देवखेड 1, दगडवाडी 1, निमखेड 1, सातेगांव 2, मंडपगांव 1, नागणगांव 1,जळगांव 1, दे. मही 1,   सिं. राजा शहर :10,  सिं. राजा तालुका : किनगांव राजा 1, पिंपळगांव 2,  सोयंदेव 4, देवखेड 1, सवडत 3, भोसा 1,  शेंदुर्जन 2, आंबेवाडी 1, शिवणी 1, उगला 1, कडपंची 1, वाघोरा 2, पळसखेड 1,  मलकापूर पांग्रा 1, दुसरबीड 3, हनवतखेड 1,  शिंदी 1, कंडारी 1, लोणार शहर : 1 , लोणार तालुका : महारचिकना 1, गनपूर 1,देऊळगांव कोळ 1, पळसखेड जहा 2, वढव 2,     परजिल्हा अकोला 1,  कुर्हा ता. मुक्ताईनगर 1, जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 630 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान महीमळ ता. चिखली येथील 65 वर्षीय व 78 वर्षीय पुरूष, निमगांव ता. नांदुरा येथील 79 वर्षीय महिला, आदर्श नगर, खामगांव येथील 74 वर्षीय पुरूष, वालसावंगी ता. भोकरदन जि जालना येथील 68 वर्षीय महिला  रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3196 नमुने घेण्यात आले आहे.  तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 886 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 218713 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 31990 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 31990 आहे. 

   आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 218713 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 37744 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 31910 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 5494 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 260 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

********


नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

-    पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
  • वाढती रूग्णसंख्या बघता प्रशासनाने सज्ज रहावे

बुलडाणा, (जिमाका) दि 31 :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोना संसर्ग सुरक्षा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कुणालाही सोडू नये, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

  कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक आज 31 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

  जिल्ह्यात  भविष्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने आपली तयारी ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले,  प्रशासनाने रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता बेड, ऑक्सीजन पुरवठा, औषधी पुरवठा आदींची सज्जता ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नये. ऑक्सीजनची पर्याप्त व्यवस्था करून ठेवावी. येणारे दोन महिने जिल्ह्यासाठी चिंतेचे असून या परिस्थितीवर समन्वयाने मात केल्या जाईल.  गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

   ते पुढे म्हणाले,  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. नियमानुसार पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी कालमर्यादा ठेवावी.  तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याप्रसंगी जिल्ह्यातील टाळेबंदीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले.

    मरण दारी आणि तोरण दारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  लोकांना सांगून देखील लोक ऐकत नाही, नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यात किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा लागेल असे मत सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यानुसार पालकमंत्री यांनीदेखील नागरिक अशाचप्रकारे नियमांचे पालन करीत नसतील, तर लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा यावेळी दिला.  

*********

 


कोविड नियंत्रणासाठी लसीकरणाची गती वाढवा

-    पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • सिंदखेड राजा येथे कोविड नियंत्रण बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि 31 :  कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड नियंत्रणासाठी विविध उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत. सध्या कोविड नियंत्रणासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. नियमानुसार पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करण्यासठी लसीकरणाची गती वाढवावी , अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी  आज सिंदखेड राजा ग्रामीण रूग्णालयात आयोजित बैठकीत दिल्या.

  बैठकीला तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार जयवंत सातव, आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ बनसोड, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी देव गुन्हावत आदी उपस्थित होते.   

   परिसरात रूग्ण आढळून येत असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, ज्या गावांत रूग्ण आढळून येत आहे त्याठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या. तसेच रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात. गृह विलगीकरणातील रूग्णांवर लक्ष ठेवावे. तसेच गावागावात लसीकरण करण्यासाठी यंत्रणांनी सामुहिक प्रयत्न करावे. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

                                                            *********

 

No comments:

Post a Comment