Wednesday 17 March 2021

DIO BULDANA NEWS 17.3.2021

डाक अदालतीचे 24 मार्च रोजी आयोजन बुलडाणा,(जिमाका) दि.17: बुलडाणा डाक विभागाच्यावतीने बुधवार, 24 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता डाक अधिक्षक यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या कामा संबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकारण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतल्या जाणार आहे. विशेष टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहे. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. त्यामध्ये तारिख व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अधिक्षक ए. के इंगळे यांचे नावे दोन प्रतीसह अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या पत्त्यावर 22 मार्च 2021 पर्यंत पाठवाव्यात. तदनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केल्या जाणार नाही, असे अधिक्षक, डाकघर बुलडाणा यांनी कळविले आहे. ****** बांधकाम कामगारांना डिीबीटीद्वारे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी कामगाराची कुणी फसवणूक केल्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी बुलडाणा,(जिमाका) दि.17: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. लगतच्या मागील 12 महिन्यात बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कागमारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पद्धतीने खात्यात जाम करण्यात येतो. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी स्वत:ची नोंदणी करण्यासाठी www.mahabocw.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह त्यामध्ये ओळखीचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, स्वयं घोषणापत्र, 90 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र, स्वत:चे बँकेचे पासबुक आदींचा समावेश असावा. तसेच ज्याय बांधकाम कामगारांना नुतनीकरण झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यास त्यांनी सुद्धा ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. त्यानंतर अर्ज नामंजूर झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यास त्रुटींची ऑनलाईन पुर्तता करून अर्ज परत सादर करावा. तदनंतर सदर कामगारास अर्ज मंजूर झाल्याचा संदेश दुरध्वनीवर प्राप्त झाल्यानंतर कार्यालयात प्रत्यक्ष बांधकाम कामगारांनी उपस्थित राहून नोंदणी अथवा नुतनीकरण पावती व नवीन नोंदणी असणऱ्या बांधकाम कामगारांनी स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे. याकरिता नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 1 रूपया प्रती माह प्रमाणे 12 रूपये एक वर्षाचे भरून पावती घ्यावी. या व्यरितिरिक्त कोणतेही शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांकरीतासुद्धा बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. लाभाचे अर्ज तपासणी नंतर लाभाची रक्कम बांधकाम कामागारांच्या खात्यात परस्पर आरटीजीएस द्वारे मंडळ स्तरावरून वर्ग करण्यात येते. तरी कार्यालयीन कामकाजाकरीता कामगारांनी प्रत्यक्ष कार्यालयास संपर्क साधुन कामकाज करावे. त्रयस्थ व्यक्तीच्या मोहाला बळी पडू नये. कोणत्याही कामगाराची जर फसवणूक होत असेल, तर त्यांनी संबंधीतांविरूद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. *******

No comments:

Post a Comment