Posts

Showing posts from June, 2020

DIO BULDANA NEWS 30.6.2020

अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला ओळख पटविण्याचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.30 :   एका अनोळखी इसमाचा मृतदेह भवन निवास, ढासाळवाडी तलावासमोर, ढासाळवाडी येथे आढळून आलेला आहे. या मृतकाच्या अंगावर लाल – पांढऱ्या रंगाचे चौकडीचे शर्ट, शर्टाचे आत काळ्या – भुरकट रंगाची टी शर्ट व निळ्या रंगाची कॉटन पॅन्ट घातलेली आहे. मृतकाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष आहे. याप्रकरणी ढासाळवाडी येथील पोलीस पाटील सौ. रेखा अजय शेवाळे यांनी रायपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार रायपूर पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. तरी वर नमूद वर्णन केलेल्या इसमाची ओळखीचा असल्यास त्यांनी तात्काळ रायपूर पोलीस स्टेशनला किंवा 07262-270030 क्रमांकावर संपर्क करावा,  असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून रायपूर पोलीस स्टेशनने केले आहे. *****                            जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार बुलडाणा,(जिमाका) दि.30 :   जिल्ह्यातील ग्...

DIO BULDANA NEWS 27.6.2020

केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी ·            जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ·          प्रतिबंधीत क्षेत्रात परवानगी नाही बुलडाणा, दि.27 (जिमाका):  जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी  दिले आहेत.       दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 1 जुन 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत ...

DIO BULDANA NEWS 26.6.2020

ढाई अखर पत्रलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर एडेड हायस्कूलच्या अतुल राठोडला राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक बुलडाणा,(जिमाका) दि.26 :  भारतीय डाक विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने सर्व वयो गटातील विद्यार्थ्यांसाठी ढाई अ ख र पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा विषय प्रिय बापू, आप अमर है.. हा होता. बुलडाणा डाक विभागातून या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेमध्ये बुलडाणा येथील एडेड हायस्कूलचा वर्ग 10 वीचा विद्यार्थी अतुल रोहीदास राठोड याने महाराष्ट्र स्तरावरील प्रथम क्रमांकाचे 25 हजार रूपयांचे पारितोषिक पटकाविले आहे.     बुलडाणा डाक विभागाचे अधिक्षक मनोहर पत्की यांनी स्वत: स्वयंस्फुर्तीने या विद्यार्थ्यांचा एडेड हायस्कूलमध्ये जावून गौरव केला. यावेळी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, सोसायटीचे सचिव ॲड बाळासाहेब कविमंडन, मुख्याध्यापक आर. ओ पाटील, बुलडाणा डाक विभागाचे निरीक्षक निलेश वायाळ, सुनील हिवराळे, कर्मचारी प्रमोद रिंढे, नितीन उमाळे, रामेश्वर सोळंकी, विद्यार्थ्याचे वडील रोहीदास र...

DIO BULDANA NEWS 25.6.2020

Image
पोलीस दलाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिसीद्वारे केले मार्गदर्शन बुलडाणा,(जिमाका) दि.25 :  जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांच्या तातडीच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी स्व. दिपक जोग स्मृती भवन येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे  फित कापून  उद्घाटन आज 25 जुन रोजी जानेफळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले,  पोलीस उपअधिक्षक (गृह) बळीराम गिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक  गिरीष ताथोड आदींची उपस्थिती होते.        तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी येथे व्हिसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...

DIO BULDANA NEWS 23.6.2020

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019-20 खातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास योजनेचा लाभ बुलडाणा, दि.   23   :   अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली. या योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे . या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी...

DIO BULDANA NEWS 22.6.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 83 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 08 पॉझिटिव्ह 08 रुग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.22  : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 83 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे धामणगांव बढे ता. मोताळा येथील 22 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी व 65 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच मलकापूर येथील 52 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय वृद्ध महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला व समर्थ नगर खामगांव येथील 53 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तसेच मलकापूर येथील 19 जुन 2020 रोजी दाखल 52 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला होता. सदर मयत रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याची मृत्यूसंख्या 8 झाली आहे.      जिल्ह्यामध्ये मलकापूर व संग्रामपूर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, दे.राजा, चिखली व बुलडाणा तालुक्यात सध्या एकही क्रीयाशील कोरोना रूग्ण नसल्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त आहे. मलकापूर...

DIO BULDANA NEWS 19.6.2020

Image
प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावे -           पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ·          कृषी व महसुल प्रशासनाला दिल्या सुचना बुलडाणा ,(जिमाका) दि. 19 :  सिंदखेड राजा तालुक्यामध्ये  नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच शेडनेटमधील पिकांप्रमाणे इतर पिकांचे तालुक्यात 11.85 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगंणे यांनी  तालुका कृषी अधिकारी व महसुल प्रशासनास दिल्या आहे.  पालकमंत्री यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगांव राऊत, विझोरा, उगला पिंपळगांव लेंडी यासह अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष जावुन नुकसानीची पाहणी केली आहे.     सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करून आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी आणि प्रशासनाने कुणीही नुकसानग्रस्त...

DIO BULDANA NEWS 18.6.2020

बँकांनी पात्र शेतकऱ्यांना 30 जुनपर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे -           पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे 30 जुन नंतर पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांविरूद्ध कारवाई हेअर कटचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले असल्यास परत करावे ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क घ्यावे, कापूस खरेदी पूर्ण करावी बुलडाणा, दि. 18 (जिमाका) :  खरीप   हंगाम सुरू झालेला आहे. सुरूवातीला पाऊस बऱ्यापैकी आल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तसेच उर्वरित शेतकरी पेरणी करीत आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्ज वाटप या बाबीला प्राधान्य देवून पात्र सभासद शेतकऱ्यांना 30 जुनपर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, तसेच सभागृहात आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमू...