Thursday 9 April 2020

DIO BULDANA NEWS 9.4.2020

यंत्रणांनी समन्वयाने काम करीत कोरोना संकटावर मात करावी
-         विभागीय आयुक्त पियुष सिंग
·        जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
बुलडाणा, दि.  (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी  शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी करण्यात आले आहे. या काळात यंत्रणांनी समन्वय साधत काम करावे. नागरिकांना जिवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी काम करावे, कुठेही वस्तूंचा पुरवठा कमी पडू देवू नये, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज दिले.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात नोडल अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांची  उपस्थिती होती.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय ते आरोग्य उपकेंद्र येथे कोणत्याही प्रकारचा ताप असलेले रुग्ण आले तर त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना देत विभागीय आयुक्त म्हणाले,  आरोग्य यंत्रणांनी याकाळात सतर्क राहून काम करावे. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक औषधी, मास्क, उपकरणे व साहित्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखान्यांच्या ओपीडी सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक व्हेंटीलेटर तयार ठेवावे. आणीबाणीच्या परिस्थितीत औषधांचा साठा खाजगी मेडीकल दुकानदारांकडेही तयार ठेवावे.
ते पुढे म्हणाले, संचारबंदी कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित सुरु राहील, याची काळजी घ्यावी.  तसेच कृषि निविष्ठांची वाहतूक सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनचा गैरफायदा घेवून चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होणार नाही, याची खात्री करावी. स्वस्त धान्य दुकानांमधून नियमित अन्नधान्य वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना ५ किलो मोफत तांदूळ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. सदर पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
   राशन कार्ड नसलेल्या दिव्यांग बांधवांना स्वयंसेवी संस्थामार्फत धान्य पुरविण्याचे सूचीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, ज्या दिव्यांग बांधवांकडे रेशन कार्ड आहे, त्यांना प्राधान्याने धान्य पुरवठा करावा. राशन न मिळण्यासंदर्भात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात. दिव्यांग सहाय्यता कक्ष व हेल्पलाईनवरील तक्रारींची नोंद ठेवण्यात यावी. औषध साठ्याबाबत केमीस्टांची नियमित बैठक घ्यावी. त्यांना मे अखेर पुरेल एवढा साठा आताच करण्यास सांगावे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्यास ती तात्काळ मागणीनुसार सुरू करावी. या कामांमध्ये मजूरांना सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या सुचना द्याव्यात. मनरेगाची कामे बंद ठेवू नये.  निवारा केंद्रामध्ये आवश्यक सुविधा पुरवाव्यात. येथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांचे नियमित समुपदेशन करावे. तसेच त्यांच्या संपर्कासाठी पीसीओ अथवा त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये रिचार्ज मारून द्यावे. तसेच नियमित आरोग्य तपासणी करावी.
यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्याची कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे,  उपजिल्हाधिकारी ‍भिकाजी घुगे, श्री. माचेवाड,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीराम पानझाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. मेहेर आदी उपस्थित होते.
******

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी दिले एक दिवसाचे वेतन
·        मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
बुलडाणा,दि.9(जिमाका):महाराष्ट्रामध्ये सध्य:स्थितीत कोविड19 विषाणुमुळे अत्यंत गंभिर परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये राज्य  शासनाकडुन सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. समाजिक बांधीलकीची जाणीव ठेवुन दि. 
बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचे वेतन 4 लक्ष 26 हजार 700 मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे दृष्टीने जमा केलेले आहे.सदर जमा केलेल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम 4,26,700रूपयांचा धनादेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक खरात यांनी आज 9एप्रिल 2020 रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांना सुपूर्द केला. 
                                                                        *****
कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी – विक्री सुरू
·        सोशल डिस्टसिंग पाळत बाजार समितीच्या नियोजनानुसार शेतमाल विक्रीस आणावा
·        जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
बुलडाणा, दि.  (जिमाका) : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. यामध्ये सर्व शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू असताना कोरोना विषाणू प्रादुर्भाव होणार नाही, यासठी सर्व आवश्यक सूचना संबंधित बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी – विक्री होत असताना गेटवर सॅनीटायझर व हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, सर्वांनी तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळून सोशल डिस्टसिंग पाळणे, परिसर व स्वच्छतागृह स्वच्छ करणे, परीसर निर्जंतुकीकरण करणे, शेतमालाचा लिलाव करताना शेतमालाचे ढेर विशिष्ट अंतरावर टाकणे, वेगवेगळ्या शेतमालाचा वेगवेगळ्या वेळेवर करणे, गर्दी टाळण्याकरीता शेतकऱ्यांची नोंदणी पद्धत अंवलंबिणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
    तरी सर्व शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणण्यापूर्वी बाजार समितीचे सचिव किंवा संबंधीत अडते, व्यापारी यांचेसोबत संपर्क करून त्यांनी केलेल्या नियोजनानुसार वेळ व दिनांक प्राप्त करून घ्यावे. त्याच वेळेमध्ये शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा. संचारबंदीत शेतमाल विक्रीस आणण्यासाठी पोलीसांनी मुभा दिलेली आहे. तरी वरील सर्व उपाययोजना अंमलात आणून कोरोना आजाराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे. शेतमाल विक्रीबाबत अधिक माहितीसाठी बाजार समित्यांचे सचिव यांना संपर्क करावा.
 त्यांचे सपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :  बुलडाणा सचिव श्रीमती वनिता साबळे ९४२२८८४७४५, मोताळा सचिव एस. जी राहणे ९४२१४७३२९७, मलकापूर सचिव बी. जे जगताप ९४२२९४०६८१,  नांदुरा सचिव गौरव गवळे ९५४५७७४२९७, जळगांव जामोद सचिव प्र. ना पुदागे ९४२१४६५०७७, संग्रामपूर सचिव पी. एन मारोळे ९६३७११०७४७, शेगांव सचिव वि. गु पुंडकर ८१४९७७४४४१,  खामगांव सचिव एम.एस भिसे ७७२००३९५६१,  चिखली सचिव आर. जे शेटे ९४२३७३९९४१,  मेहकर सचिव श्री. बार्डेकर ९०११२२७९९८,  देऊळगांव राजा सचिव कि. वी म्हस्के ८८३०८३८७७१, सिंदखेड राजा सचिव ओ. व्ही महाजन ९९२३६०६५६३ आणि लोणार सचिव रा. ते वायाळ ९८९०४६४८२५ .  
                                                                        *******


कोरोना अलर्ट :  जिल्ह्यात आज प्राप्त 27 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’, तर 3 पॉझीटिव्ह
 * संस्थात्मक विलगीकरणात 101 नागरिक
* अलगीकरणात सद्यस्थितीत 25 दाखल
बुलडाणा, दि. 9 (जिमाका):  जिल्ह्यात आज 1 संशयीत व्यक्ती बुलडाण आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात दाखल करण्यात आले आहे. काल संशयीत व्यक्तींचे 44 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज 30 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 27 निगेटीव्ह व 3 पॉझीटीव्ह आले आहे.  आज प्रयोगशाळेत 13 नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे. 
     घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या  नागरिकांमध्ये आज  भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. काल दि. 8 एप्रिल 2020 पर्यंत 86 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या  नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 86 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज एकूण 101 नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज 1 मुक्तता करण्यात आली. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 101 नागरिक आहेत.
     आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 25 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 5, शेगांव 9 व बुलडाणा 11 व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 67 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 96 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 25 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 30 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 14, शेगांव 5 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 182 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 155 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 15 पॉझीटीव्ह व  140  निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत.  तसेच 27 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment