Tuesday 14 April 2020

BULDANA CORONA ALERT 14.4.2020

कोरोना अलर्ट : आज प्राप्त रिपोर्टपैकी 50 निगेटीव्ह, तर 4 पॉझीटीव्ह
*अलगीकरणात 27 दाखल
*अलगीकरणातून दहा संशयीत नागरिकांना सुटी
बुलडाणा, दि. 14 : जिल्ह्यातील कालपर्यंत 57 रिपोर्ट प्रयोगशाळेकडे प्रलंबित होते. त्यापैकी आज 54 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यामध्ये 50 निगेटीव्ह, तर 4 पॉझीटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आज 12 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. अशाप्रकारे 15 अहवाल सध्या प्रतीक्षेत आहेत. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये तीन मलकापूर, तर एक बुलडाणा येथील आहे.  तसेच पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये 60 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 42 व 51 वर्षीय पुरूष आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.        
     काल दि. 13 एप्रिल 2020 पर्यंत 93 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. त्यामध्ये आज वाढ झालेली नाही. तसेच 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झालेल्या कुणाचीही आज मुक्तता करण्यात आली नाही.  संस्थात्मक विलगिकरणातून आज दोन नागरिकांची मुक्तता करण्यात आलेली आहे.  संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 51 नागरिक आहेत.
     जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात आज सहा संशयीत दाखल करण्यात आलेला आहे.  सद्यस्थितीत  खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 3, बुलडाणा 22 व शेगांव येथे 2 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 27 व्यक्ती अलगीकरणात आहेत.   घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 145 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 164 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. अलगीकरणातून आज दहा संशयीतांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 51 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 19 , शेगांव 11 व खामगांव येथील 21 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 260 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज 12 नमुने पाठविण्यात आले आहे.  एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी 245 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 21 पॉझीटीव्ह व  224 निगेटीव्ह रिपोर्ट आले आहेत. तसेच एक मृत्यू झाला आहे. तसेच 15 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
*******
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 129 व्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
                                                                        *********

No comments:

Post a Comment