Monday 27 April 2020

CORONA ALERT NEWS 27.4.2020


‘साहब… आपने हमारी बहोत खिदमत की..’!
·        रूग्णालयातून सुट्टी झालेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या भावना
·        आज एकाला दिली सुटी
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना बाधीत होने के बाद हमे यहा लाया गया…  यहा पे हमारी अच्छी खिदमद की गई..अल्लाह की दुआँसे आज सब ठिक हुआ.. यहॉ के डॉक्टर्स, स्टाफ ने हमारी बहोत खिदमद की.. डॉक्टर साहब ने भी हमे हमारा बहोत ख्याल रखा.. पुरा मुल्क इस बिमारी से मुक्त हो जायगा.. अशा भावना कोरोनातून वाचलेल्या व आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या.   

     जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची  भर पडली आहे. आज सिंदखेड राजा येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण 15 रूग्ण बरे झालेले आहे.
   प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सिंदखेड राजा येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदीत होता.
    या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

    त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 15 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच , 23 एप्रिल रोजी 3 आणि आज 27 एप्रिल रोजी एका रूग्णाला बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. अशाप्रकारे 15 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. आता 5 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
   सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                              ****
दिव्यांग तपासणी शिबिर महिन्यातील प्रत्येक बुधवारी सुरू राहणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा व सामान्य रूग्णालय, खामगांव येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे 1, 8 व 15 एप्रिल  2020 चे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले होते. तरी यापुढे जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान-नाक-घसा संबंधित तसेच सामान्य रूग्णालय, खामगांव येथील अस्थिव्यंग व नेत्र संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर महिन्यातील प्रत्येक बुधवारी नियमितपणे सुरू राहणार आहे. याची दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
                                                              ******                                                                                  पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर गावची लोकसंख्या 625 आहे. या टँकरद्वारे गावाला दररोज 13 हजार 500 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिलहाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                                            *******
कोविड -19 मुकाबल्यासाठी 346 खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अंतर्गत अधिसूचना निर्गमीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची संख्या अपूरी पडत असल्यामुळे जिल्ह्यातील 346 खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टर्स) यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांनी 21 एप्रिल 2020 पासून पुढील आदेशापर्यंत सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत.
   या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये बुलडाणा येथील 133, चिखली येथील 36, मलकापूर येथील 32,  नांदुरा येथील 11, जळगांव जामोद येथील 8, लोणार येथील 5, सिंदखेड राजा येथील 3, दे. राजा येथील 7, शेगांव येथील 11 आणि खामगांव येथील तब्बल 96 डॉक्टरांचा समावेश आहे.
  या डॉक्टरांना जेथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी पाचारण केले जाईल. तेव्हा न चुकता तेथे हजर व्हावे लागणार आहे. तसेच त्यांची वैद्यकीय सेवा विनाविलंब द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे या डॉक्टरांनी त्यांची रूग्णालये सुरळीत सुरू ठेवावी आणि कोणत्याही नॉन कोविड रूग्णास उपचार करण्यास नकार देवू नये.  सेवा अधिग्रहीत केलेल्या  डॉक्टरांनी कोविड – 19 या आजाराकरीता सेवा उपलब्ध करून न  दिल्यास त्यांचे विरूद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची नोंदणी रद्द करण्याकरिता इंडियन मेडीकल कॉन्सील तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष सुमन चंद्रा यांनी कळविले आहे.
                                                                                 *****
मासेमारी व मासळी विक्री अत्यावश्यक सेवा
·        परवानगीसाठी अर्ज करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. लॉक डाऊन कालावधीत मत्स्यव्यवसाय विभागाचे अत्यावश्यक सेवा म्हणून समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मासेमारी व मासळी विक्री यांना विविध सुविधांचा लाभ देण्यासाठी विभागामार्फत कोविड – 19 ई- पास संगणक कार्य प्रणाली विक्षीप्ती करण्यात आलेली आहे. मत्स्यव्यवसायाचे सर्व कृती करण्यास तातडीची सेवा म्हणून शासनाने समावेश केल्याचे जिल्हाधिकारी यांनी 11 एप्रिल 2020 रोजी मान्यता दिलेली आहे. मासेमारी करणे, मासळीस खाद्य टाकणे, वाहतूक करणे, पॅकिंग करणे, विक्री करणे आदी तातडीचे कामांचे कारणास्तव परवानगीसाठी bulfish@rediffmail.com या ई मेल आयडीवर अर्ज करावेत. अर्ज करताना नाव व पत्ता, आधार कार्ड क्रमांक व छायांकित प्रत, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सभासद असल्यास नाव व संस्थेचा पत्ता, सभासद क्रमांक, परवाना कालावधी, वाहतूक असल्यास कुठून कुठपर्यंत, मासेमारीमधील कृती, मासळी वाहतूकीचे वाहन क्रमांक व चालकाचे नाव व पत्ता या माहितीचा उल्लेख असलेला अर्ज अनिवार्य आहे, असे सहाय्यक आयुक्त स इ नायकवडी यांनी कळविले आहे.
*****

जिल्हाधिकारी  कार्यालयात
महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयात 26 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.                                                                                                                                                                           ******
                    कोरोना अलर्ट :
                                आज प्राप्त 20 रिपोर्टपैकी 17 अहवाल निगेटीव्ह; 3 पॉझीटीव्ह  '
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात आज 20 रिपोर्ट प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले आहे. यामध्ये 20 रिपोर्ट निगेटीव्ह असून 3 रिपोर्ट पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले तिनही रूग्ण मुळचे कामठी जि. नागपूर येथील आहेत. त्यांचे वय 63, 62 व 75 वर्ष आहे. आज रोजी जिल्ह्यातील 10 नमुने प्रतीक्षेत आहे. आज कोविड रूग्णालयातून एका कोरोनाबाधीत रूग्णाला डिस्जार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या 15 झाली आहेत. आज तीन रूग्ण बाधीत आल्याने उपचार सुरू असलेली रूग्ण संख्या 8 झाली आहे.
     जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या 24 झाली असून त्यापैकी एक रूग्ण मृत आहे. तसेच 23 रूग्णांपैकी 15 रूग्णांना बरे झालयाने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रूग्णालयात सध्या 8 रूग्णांवर उपचार सुरू आहेत  आजपर्यंत एकूण प्राप्त निगेटिव्ह अहवाल 357 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                                                    *******
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन कार्यक्रम साधेपणाने
बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने शासनाने 15 एप्रिल 2020 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे.
  मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वाजता केवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पालकमंत्री, जिलहाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित राहणार आहे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये, कवायतीचे आयोजनही करण्यात येवू नये, अशा शासनाने सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे 2020 रोजी सकाळी 8 वाजता पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपरोक्त मान्यवर वगळता कुणीही या कार्यक्रमास  उपस्थित राहू नये. तसेच जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ घेवू नये, असे  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी  पुरी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment