Tuesday 27 June 2023

DIO BULDANA NEWS 27.06.2023

 परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : राज्य शासनाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना  परदेशात  पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यायेते. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

    विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. दि. 30 जून 2023 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला  येथे सादर करावे लागणार आहे. अर्ज करण्यारिता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

00000



नेहरू युवा केंद्रात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

बुलडाणा, दि. 27 : नेहरू युवा केंद्रामध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, सहाय्यक धनंजय चाफेकर, विलास सोनोने पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन

*स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, सुब्रतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या वतीने 2023-24 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप, सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. दि. 13 ते 15 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूकरीता सबज्युनिअर 14 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी मुले वयोगटात दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघानी नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी दि. 10 जुलैपर्यंत करणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूकडे जन्माचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूची वैद्यकीय तपासणी होणार असू यात कही खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धा 14 वर्षाआतील मुले सबज्‍युनिअर स्पर्धा दि. 13 जुलै 2023, 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर स्पर्धा दि. 14 ते 15 जुलै 2023, 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर स्पर्धा दि. 14 ते 15 जुलै 2023 घेण्यात येणार आहे.

प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने पाठवावे लागणार आहे. 14 वर्षाआतील खेळाडूकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करणे आणि subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 27 : येत्या खरीप हंगामासाठी पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि बँकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यासाठी त्यांनी 30 जूनपूर्वी पिककर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक डॉ. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. डॉ. तुम्मोड यांनी, यावर्षी पिककर्ज वाटपाची गती संथ आहे. एक हजार 470 कोटी रूपयांचे उद्दीष्ट असले तरी आतापर्यंत 604 कोटी वाटप करण्यात आलेले आहे. यात कर्ज नुतनीकरणात अर्ज येत असल्यास येत्या 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पिककर्ज नुतनीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावे.

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पिककर्ज नुतनीकरण केल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या व्यास सवलत योजनेचा लाभ मिळतो. तसेच 30 जूनपूर्वी कर्ज नुतनीकरण केल्यास तीन लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य व्याजदर लागत असल्याने 10 टक्के वाढीव कर्ज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने पिककर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन केले.

यात आर्थिक वर्ष 2022-23 चा प्रगती अहवाल अग्रणी जिल्हा प्रबंधक नरेश हेडाऊ यांनी सादर केला. मागील वर्षीचा जिल्ह्याचा पत आराखडा चार हजार 350 कोटी रूपयांचा होता. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी सात हजार 667 कोटी रूपयांचा पतपुरवठा केला आहे. उद्दीष्टापेक्षा 177 टक्के कर्ज वाटप जिल्ह्यात करण्यात आले आहे. यात प्राथमिकता प्राप्त क्षेत्रामध्ये चार हजार 95 कोटी रूपयांचे उद्दीष्ट असून पाच हजार 86 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कृषि क्षेत्रामध्ये दोन हजार 700 कोटी उद्दीष्टाच्या तीन हजार 657 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. हेडाऊ यांनी दिली.

00000

चिंचखेड नाथ इसलवाडीला टँकर मंजू

*मोताळा तालुक्यातील 1 गावाचा समावेश

बुलडाणा, दि‍. 27 : जिल्ह्यातील काही तालुक्यातील चिंचखेड नाथ इसलवाडी येथे सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून दरडोई दरदिवशी 20 लिटर्स आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मोताळा तालुक्यातील चिंचखेड नाथ इसलवाडी या 1 हजार 760 लोकसंख्या आणि 682शूधन असलेल्या गावासाठी 55 हजार 660 लिटर टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत मिळणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे.

000000

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि‍. 27 : बुलडाणा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक सत्र 2023-24 करीता अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थिनींकरीता अकरावी आणि पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरिता वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थिनींनी swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरुन हार्डकॉपी, विहित शैक्षणिक कागपदत्रे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, राऊत मंगल कार्यालय, सर्क्यूलर रोड, जिजामाता महाविद्यालयाजवळ, बुलडाणा येथे वसतिगृह कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे.

वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांचे आधार कार्डशी संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे निर्वाह, भोजन, स्टेशनरी ड्रेसकोड, शैक्षणिक सहल आदी भत्ते देण्यात येतात. विद्यार्थिनींनी अर्जामध्ये स्वत:चा किंवा पालकांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खाते, तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा, ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना ते धार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतंत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झालेला नसावा, त्याची खात्री करुन घ्यावी. विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्जामध्ये बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करुन घ्यावी. प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, दहावीची गुणपत्रिका, मेडीकल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईजचे फोटो दी अचूकपणे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे, असे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment