Monday 26 June 2023

DIO BULDANA NEWS 23.06.2023

 स्टँड अप इंडिया योजना

बुलढाणा, दि‍.23 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत केंद्र  शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्भ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केला आहे.

स्टँड अप इंडिया योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावेत. उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रामणपत्र व बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावेत. योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅड अप इंडिया योतनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल. बुलडाणा जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी परिशिष्ट अ नमुना अर्ज भरून द्यावा. अर्जात माहिती नमूद करुन त्यासह वरील आवश्यक कागदपत्र जोडून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, बुलडाणा या कार्यालयास 30 जून 2023 पर्यंत सादर करावे.

                                                            00000000

दिव्यांग व्यक्तीसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करीता अर्ज आंमत्रित

बुलढाणा, दि‍.23 :- बुलडाणा जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करीता नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहे. गृह कामकाज मंत्रालयाच्या केंद्रीकृत पोर्टलवर www.awards.gov.in अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज किंवा नामांकन वरील संकेत स्थळावर भरण्यात यावे. राष्ट्रीय पुरस्कार 2023 करीता 30 जून 2023 या कालावधीपर्यंत संकेतस्थळ सुरू राहील. राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करीता अर्ज केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या वेबसाईटवर पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन सादर करावेत. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशीष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्द्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाव्दारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील नमुद विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in  या संकेतसंस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमिकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठी च्या मार्गदर्शक सुचनांनुसार विचारात घेण्यात येतील.

                                                00000000

तूर व उडीद डाळींकरीता निर्बंध लागू

बुलढाणा, दि‍.23 :- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार दि.2 जून 2023 अन्वये तूर व उडीद डाळींच्या घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच मिलर्स व इम्पोर्टर्सकरीता साठा निर्बंध लागू केले आहेत. सदर डाळीवरील साठा निर्बंध 30 ऑक्टोंबर 2023 पर्यंत लागु राहणार आहेत. आदेशानुसार डाळींकरीता पुढीलप्रमाणे साठा निर्बंध लागु करण्यात आले आहेत.

घाऊक व्यापारी-प्रत्येक डाळींसाठी 200 मेट्रीक टन, किरकोळ व्यापारी- प्रत्येक डाळीसाठी 5 मेट्रीक टन, बिग चेन रिटेलर्स- प्रत्येक डाळींसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी 5 मेट्रीक टन  व डेपोसाठी 200 मेट्रीक टन. मिलर्स- गत 3 महिन्यातील असलेले उत्पादन किेंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25 टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागू राहील. इम्पोर्टस (आयातदार)- सीमा शुल्क मंजुरीच्या दिनांक पासून 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करुन ठेवता येणार नाही. याप्रमाणे कायदेशिर घटकांकडे असणारा डाळींचा साठा fcainfoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थाळवारव नियमीतपणे जाहिर करण्यात यावा.

केंद्र शासनाची अधिसूचना दि. 12 जून 2023 अन्वये घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच प्रोसेर्सकरीता गव्हाच्या साठयावर निर्बंध लागु केले आहेत. सदर गव्हाच्या साठयावरील निर्बंध दि 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहेत.  गव्हाकरीता साठा निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

घाऊक व्यापारी – 3000 टन , किरकोळ व्यापारी – प्रत्येक किरकोळ आऊटलेट साठी 10 टन, बिग चेन रिटेलर्स- प्रत्येक आऊटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3000 टन, प्रोसेस- वार्षिक स्थापित क्षमतेच्या 75 टक्के किंवा मासिक स्थापित क्षमता गुणिले सन 2023-24 चे उर्वरित महिने यापैकी जे कमी असेल ते.

याप्रमाणे  कायदेशिर घटकांकडे असणारा गव्हाचा साठा evegoils.nic.in/wsp/login या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर नियमीतपणे जाहिर करण्यात यावा. या अधिसुचने पासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठयाच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवयश्यक राहील. साठा निर्बंधापेक्षा जास्त साठा असणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.

                                                            00000000

तूर व उडीद डाळींकरीता व गव्हाचा साठा निर्बंध लागू

बुलढाणा, दि‍.23 :- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार दि.2 जून 2023 अन्वये तूर व उडीद डाळींच्या घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच मिलर्स व इम्पोर्टर्सकरीता साठा निर्बंध लागू केले आहेत. सदर डाळींवरील साठा निर्बंध 30 ऑक्टोंबर 2023 पर्यंत लागु राहणार आहेत. आदेशानुसार डाळींकरीता पुढीलप्रमाणे साठा निर्बंध लागु करण्यात आले आहेत.

घाऊक व्यापारी-प्रत्येक डाळींसाठी 200 मेट्रीक टन, किरकोळ व्यापारी- प्रत्येक डाळीसाठी 5 मेट्रीक टन, बिग चेन रिटेलर्स- प्रत्येक डाळींसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी 5 मेट्रीक टन  व डेपोसाठी 200 मेट्रीक टन. मिलर्स- गत 3 महिन्यातील असलेले उत्पादन किेंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25 टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागु राहील. इम्पोर्टस (आयातदार)- सीमा शुल्क मंजुरीच्या दिनांकपासून 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करुन ठेवता येणार नाही. याप्रमाणे कायदेशिर घटकांकडे असणारा डाळींचा साठा fcainfoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थाळवारव नियमीतपणे जाहिर करण्यात यावा.

केंद्र शासनाची अधिसूचना दि. 12 जून 2023 अन्वये घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच प्रोसेर्सकरीता गव्हाच्या साठयावर निर्बंध लागु केले आहेत. सदर गव्हाच्या साठयावरील निर्बंध दि 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहेत.  गव्हाकरीता साठा निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

घाऊक व्यापारी – 3000 टन , किरकोळ व्यापारी – प्रत्येक किरकोळ आऊटलेटसाठी 10 टन, बिग चेन रिटेलर्स- प्रत्येक आऊटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3000 टन, प्रोसेर्स- वार्षिक स्थापित क्षमतेच्या 75 टक्के किंवा मासिक स्थापित क्षमता गुणिले सन 2023-24 चे उर्वरित महिने यापैकी जेकमी असेल ते.

याप्रमाणे  कायदेशिर घटकांकडे असणारा गव्हाचा साठा evegoils.nic.in/wsp/login या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर नियमीतपणे जाहिर करण्यात यावा. या अधिसुचनेपासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठयाच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवयश्यक राहील. साठा निर्बंधापेक्षा जास्त साठा असणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.

                                                            00000000

 बुधवारचे  दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 23 :- जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 28 जून 2023 रोजी तपासणीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात बुधवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्रसंबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र बुधवार, दि. 28 जून 2023 रोजी बकरी ईदची शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

                                                            00000

  शेतकऱ्यांनी घरच्या घरी तयार करा मिश्र खते

 

बुलडाणा, दि. 23 :- पिकाच्या उत्पादन रासायनिक खतांचे अनन्यसाधारण महत्व असल्याने शेतकऱ्यांमध्ये खतांचा वापर वाढत आहे. पिकांच्या उत्पादनात नत्र, स्फुरद  व पालाश हे मुख्य घटक असनु कॅल्शियम ,गंधक, मॅग्नेशियम हे दुय्यम घटक आहेत. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या माध्यमातून कोणत्याही खतांचे मिश्र ग्रेड तयार करुन घरच्या घरी विशिष्ट खताच्या ग्रेडची गरज भागविता येते. सध्या बाजारात विविध ग्रेडचा संयुक्त खत उपलब्ध होत आहेत. मात्र विशिष्ठ ग्रेचा आग्रह न धरता आश्यकत खत मात्रा घरच्या घरी तयार करता येतात.

2 गोणी पुढील ग्रेड तयार करण्यासाठी खत मात्रा (किलोमध्ये),

 

सरळ खते

15:15:15

10:26:26

20:20:00

19:19:19

18:18:10

24:24:00

युरिया

32

22

43

41

39

52

एस.एस.पी

94

163

125

119

113

150

एम.ओ.पी.

25

43

0

32

17

0

एकुण खत मात्रा

152

228

168

192

169

202

 

DAP खताची 1 बॅग

SSP (झिंक व बोरॉन युक्त 3 बॅग+ 20 किलो युरिया )

खताचे प्रमाण

खताचे प्रमाण

नायट्रोजनचे प्रमाण-9 किलो

नायट्रोजनचे प्रमाण 9.2 किलो

फॉस्फरसचे प्रमाण 23 किलो

फॉस्फरसचे प्रामण 24 किलो

सल्फरचे प्रमाण-0.0 किलो

सल्फरचे प्रमाण-16.5 किलो

कॅल्शियमचे प्रमाण -0.0 किलो

कॅल्शियमचे प्रमाण -31.5 किलो

झिंकचे प्रमाण-0.0 किलो

झिंकचे प्रमाण-0.75 किलो

बोरॉनचे प्रमाण-0.0 किलो

बोरॉनचे प्रमाण-0.3 किलो

एकुण 32 किलो 0.0 किलो

एकुण :82.25  किलो खत मिळते

खताची किंमत

1350 रु DAP+ सल्फर बॅग

1350 रु +768 रु = 2118 /-

 

खताची किंमत

SSP+ ( झिंक व बोरॉनयुक्त)

3 बॅग-1350रु +20 किलो युरीया 120 रु एकूण 1470 रु

एकूण मिळणारे अन्नद्राव्याचे 2 प्रकारचे

एकूण मिळणारे अन्नद्राव्याचे 6 प्रकारचे

 

            सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, विविध संयुक्त दर व त्यांची उपलब्धता याचा विचार करता सरळ खते जरी युरिया,एस.एस.पी चा वापर करुन एक गोणी संयुक्त खतांच्या बदल्यात त्याच प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश यांची उपलब्धता करुन घेता येते. विविध पिकांच्या शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा वरील प्रमाणे सरळ खतांच्या माध्यमातुन देणे शक्य आहे.

                                                                        000000

  

राजर्षी शाहु महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून

साजरा होणार

 

बुलडाणा, दि. 23 :- राजर्षी शाहु महाराज यांची जयंती निमित्त दिनांक- 26 जुन  हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बुलढाणा येथे 26 जून 2023 हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा  करण्यात येणार आहे.

26 जून 2023 रोजी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बुलडाणा येथे रॅली तसेच समता दिडींचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर रॅली व समता दिडींला कार्यक्रमाचे प्रमुख्‍ अतिथी हे हिरवी झेंडी दाखवणार असुन दिडींची सुरुवात सकाळी 8.00 वाजता जिल्हा परिषद कार्यालय येथुन होणार आहे. तसेच राजर्षी शाहु महाराज यांची जयंती  निमित्त दिनांक- 26 जुन रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असुन सदर कार्यक्रमास समस्त नागरीकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन, सहाय्यक आयुक्त, डॉ अनिता राठोड समाज कल्याण बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            00000000

No comments:

Post a Comment