Friday 9 June 2023

DIO BULDANA NEWS 09.06.2023

 पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा

बुलडाणा, दि. 9 : नागरिकांच्या सोयीसाठी बुलडाणा आणि खामगाव येथील मुख्य डाक घर येथे आधारकार्ड विषयक सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुख्य डाक घर बुलडाणा आणि खामगाव येथे नवीन आधार आणि अद्यतन सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन आधार काढणे, आधार अद्ययावत करण्यामध्ये पत्ता, मोबाईल, ठसे अपडेट करणे, तसेच 10 वर्षे पूर्ण झालेले आधार पुन्हा अद्ययावत करण्याच्या सेवा प्रमाणित दरानुसार करून मिळणार आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात बियाणे, खतांचा मुबलक साठा उपलब्ध

*विशिष्ट बियाणे, खताचा आग्रह टाळण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यात बियाणे आणि रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खतांसाठी आग्रह करू नये, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 साठी भरपूर प्रमाणात बियाणे आणि रासायनिक खताची उपलब्धता आहे. तरीही जिल्ह्यातील काही भागामध्ये शेतकरी विशिष्ट कापूस आणि सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करीत आहे. बियाण्यामध्ये सर्वच वाण उत्कृष्ट दर्जाचे असून भरपूर उत्पन्न देणारे आहे. जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात खताची उपलब्धता आहे. त्यामुळे रासायनिक खताची टंचाई होणार नाही.

जिल्ह्यात कृषि केंद्र परवानाधारक बियाणे आणि रासायनिक खताची विक्री कमाल विक्री किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करीत असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा. यासाठी संपर्क क्रमांक 07262-299034, 9527546983 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. तसेच अडचणी किंवा तक्रारी dsaobuldana.qc@gmail.com मेलवर पाठवता, नोंदवता येईल. बियाणे, खते आणि किटकनाशके यांच्या गुणवत्ता आणि पुरवठासंबंधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात दूरध्वनी क्रमांक 07262-299034, कृषि उपसंचालक डी. बी. सवडतकर 9404991819, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एकेइंगळे 7588619505, कृषि सहाय्यक एव्हीसिरसाट 8275340540, जिल्हा परिषद जिल्हास्तरावर कृषि विभाग कार्यालयात दूरध्वनी क्रमांक 07262-242343, मोहिम अधिकारी व्हीएलखोंदील 7588041008, ग्राम विकास अधिकारी जे.एसवायाळ 9404439004, तसेच तालुकास्तरावर कृषि विभागपंचायत समिती कार्यालयात बुलडाणा कृषि अधिकारी श्रीराहाणे 9423961006, प्रीती पाटील 8378874711, चिखली कृषि अधिकारी आर. आर. येवले 7038206077, एसआरसोनुने 9404034477, मलकापूर कृषि अधिकारी गजानन पखाले 9049066291, एस. जे. तिजारे 7588502599, मोताळा कृषि अधिकारी वाय. बी. महाजन 8788399130, एसगवई 7588689686, खामगाव कृषि अधिकारी गजानन इंगळे 9527765549, जय राऊत 8275329543, शेगाव कृषि अधिकारी यू. के. जायभाये 9313846621, यू. के. फुटाणे 9420963268, नांदुरा कृषि अधिकारी शरद पाटील 9405660033, बीचव्हाण 9423146207, जळगाव जामोद कृषि अधिकारी श्री. सावंत 9423001446, आरएसनावकार 9423721795, संग्रामपूर कृषि अधिकारी एस. एन. पाटोळे 9421890778, आरएसनावकार 9423721795, मेहकर कृषि अधिकारी उद्धव काळे 7020278840, एसआरपरिहार 9511786145, लोणार कृषि अधिकारी एस. एन. कावरखे 9921800999, एस. बी. गायकवाड 9423417044, सिंदखेडराजा कृषि अधिकारी गणेश सावंत 9420082942, अंकुश म्हस्के 9130407647, देऊळगावराजा कृषि अधिकारी नामदेव जिंदे 9834040619, कुणाल चिंचोले 8275231914 यांची तक्रार निवारण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. कृषि निविष्ठाबाबत बियाणे, खते आणि किटकनाशके याबाबत तक्रारी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

 

00000

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

बुलडाणा, दि. 9 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी रविवार, दि. 11 जून 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

श्री. गडकरी यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी 11 वाजता सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पस येथे आगमन होईल. सकाळी 11.15 वाजता खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे अकोला-चिखली राष्ट्रीय महामार्गातील सालद ते नांदुरा या रस्ता लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 12.15 वाजता सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पस येथील हेलिपॅड वरून अकोला कडे प्रयाण करतील.

000000

बालकामगारांना कामावर ठेवू नये

*कामगार कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : खासगी आस्थापनांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने केले आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. या दिवसानिमित्त सरकारी कामगार अधिकारी यांनी 14 वर्षाखालील मुलांना दुकाने, हॉटेल्स व व्यापारी संस्था तसेच कारखाना मालकांनी कामावर ठेवू नये. तसेच धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेशी संबंधित उद्योग मालकांनी 18 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवू नये. संबंधित व्यवसाय मालक संघटनांनी आपल्या सभासदांना संघटनेमार्फत याबाबत अवगत करून जनजागृती करावी.

उद्योग, व्यवसायात कार्यरत कामगार संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी बालकामगार काम करताना आढळल्यास सरकार कामगार अधिकारी कार्यालयाला अवगत करावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

00000

मत्स्य व्यावसायिकांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा

*मत्स्य विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : मत्स्य व्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेतील अपघात गट विमा योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.

राज्यातील मच्छिमारांसमवेत मत्स्य व्यवसायातील कामगार, मत्स्यसंवर्धक, तसेच मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाशी निगडीत बाबींमध्ये प्रत्यक्ष संबध असलेले व्यक्ती यांना लाभदायक असून ही योजना नि:शुल्क आहे. मत्स्य व्यवसायाशी संबधित व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, धाड रोड, बुलडाणा येथे आपले आधार कार्ड, बँक पासबुक सह प्रत्यक्ष संपर्क साधावा. तसेच मच्छिमार संस्थांच्या सभासदांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधून संस्थेला आपला आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि वारसदाराच्या नावासह आवश्यक माहिती दि. 15 जून 2023 पुर्वी सादर करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सु. ग. गावडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment