DIO BULDANA NEWS 10.06.2023











 राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन

बुलडाणा, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी आज शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले.
तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे औक्षवन करून स्वागत करण्यात आले. श्री. बैस यांनी सुरुवातीला समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रींच्या गादीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात मंदिराला मिळालेली देणगी व मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि समाजपयोगी विकासकामांची माहिती घेतली. मंदिर प्रशासनातर्फे निळकंठ पाटील यांनी राज्यपाल श्री. बैस यांचा सत्कार केला. 
यावेळी आमदार आकाश फुंडकर, विभागीय आयुक्त निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या