Friday 3 September 2021

DIO BULDANA NEWS 3.9.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1630 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 09 पॉझिटिव्ह                                                                                        • 10 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1639 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1630 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 09 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 07 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 02 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 417 तर रॅपिड टेस्टमधील 1213 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1639 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे. राजा तालुका : सातेफळ 1, चिखली तालुका : कोनड खु 1, हिवरखेड 1, संग्रामपूर तालुका : लाडणापूर 1, बुलडाणा शहर : 3, शेगांव तालुका : येऊलखेड 1, परजिल्हा लोहारा ता. बाळापूर 1,    संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 09 रूग्ण आढळले आहे. तसेच 10 रूग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                    

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 695539 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86710 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86710 आहे.  आज रोजी 1050 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 695539 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87456 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86710 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 73 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            ***********

खेळाडू ही राष्ट्राची संपत्ती

  - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

 

  • राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष स्पर्धेचे उद्घाटन

  बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : खेळाडू हा राष्ट्राची संपत्ती आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कामगिरीमुळे राज्य आणि देशाचे नाव लौकिक होत आहे.  ही अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडू ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

 स्थानिक क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने 90 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरूष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

   ते पुढे म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. या दृष्टिकोनातून खेळाडूंना नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचे काम आपण क्रीडामंत्री असताना केले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा आपल्या खेळांच्या माध्यमातून देशाचं नाव उंचावत आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडूंनी देशाचा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने चांगले प्रदर्शन करावे. खेळाडूंनी सांघिक भावना जोपासूनच आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे,  असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

   बुलडाणा येथे आयोजित बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्यभरातून 271 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. या स्पर्धेमधूनच महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.  

No comments:

Post a Comment