Wednesday 15 September 2021

DIO BULDANA NEWS 15.9.2021

 सैनिकांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : माजी सैनिक कल्याण मंत्री दादाराव भुसे, सैनिक कल्याण विभाग पुणे येथील संचालक प्रमोद यादव यांच्या आदेशानुसार आजी, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या अध्यक्षतेखाली आज 15 सप्टेंबर रोजी प्रभा भवन, पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे बैठक आयोजित करण्यात आली. समितीच्या माध्यमातून आजी तसेच माजी सैनिकांनी जमीन अतिक्रमण, सैनिकांच्या कुटूंबावरील अन्याय, अत्याचार दूर करणे, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका यांच्या बाबतच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आजी, माजी सैनिकांच्या कुटूंबियांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सैनिक सेलही स्थापन करण्यात आला आहे.

  सदर समितीचे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया अध्यक्ष आहे. यामध्ये सदस्य म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर भास्कर निंबाजी पडघान, एपिया आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती अ. निकाळजे यांचा समावेश आहे. तर  बुलडाणा तालुका सदस्य म्हणून नायक हिम्मतराव रामराव उबरहंडे, चिखली तालुका सदस्य सुभेदार अशोक त्र्यंबकराव भुतेकर, मेहकर तालुका सदस्य हवालदार सुभाष जयराम इंगळे, लोणार तालुका सदस्य हवालदार भानुदास भिकाजी गोडसे,  दे. राजा तालुका सदस्य नायब सुभेदार दत्तात्रय रंगनाथ जाधव, सिं. राजा तालुका सदस्य हवालदार फकीरा जाधव, नांदुरा तालुका सदस्य सु. मे. ऑ. लेफ्ट. जी एस बगाडे, खामगांव तालुका सदस्य हवालदार संजय भाऊराव ससाणे, शेगांव तालुका सदस्य हवालदार विष्णू पहुरकर, मोताळा तालुका सदस्य हवालदार सदाशिव घाटे, मलकापूर तालुका सदस्य हवालदार गोपाल तुळशीराम दवंगे, संग्रामपूर तालुका सदस्य हवालदार भास्कर वासुदेव मालोकार आणि जळगांव जामोद तालुका सदस्य नाईक निरंजन हिरामन सावळे यांचा समावेश आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जाची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांना 12 जुलै ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत मूळ शैक्षणिक कागदपत्र तपासणी करण्यात आली आहे. अनुकंपा धारक उमेदवारांनी सेवाभरती नियमातील तरतुदीनुसार त्या त्या पदाची धारण केलेली शैक्षणिक पात्रता व अर्हतेनुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली आहे.  जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळ www.zpbuldhana. maharahtra.gov.in वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तात्पुत्या निवड यादीवर आक्षेप असल्यास संबधित अनुंपाधारक उमेदवार यांनी 20 सप्टेंबर 2021 पर्यत लेखी आक्षेप, हरकती कार्यालयास सादर करावेत या कालावधी नंतर प्राप्त आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

डाक अदालतीचे 16 सप्टेंबर रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.15: बुलडाणा डाक विभागाच्यावतीने गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता डाक अधिक्षक यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या कामा संबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकारण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतल्या जाणार आहे. विशेष टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहे. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. त्यामध्ये तारिख व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अधिक्षक ए. के इंगळे यांचे नावे दोन प्रतीसह अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा येथे  पाठवाव्यात. तदनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केल्या जाणार नाही, असे अधिक्षक, डाकघर बुलडाणा यांनी कळविले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 881 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह

  • 14 रुग्णांना मिळाली सुट्टी                                                                                  

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 884 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 881 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 139 तर रॅपिड टेस्टमधील 742 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 881 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, मेहकर तालुका : जानेफळ 1, नांदुरा तालुका : लोणवडी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 14 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                             

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 705892 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86828 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86828 आहे.  आज रोजी 946 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 705892 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87534 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86828 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 33 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

No comments:

Post a Comment