DIO BULDANA NEWS 30.6.2021
नांद्राकोळी येथील सोयाबीन शेतीला निविष्ठा व गुणनियंत्रक संचालकांची भेट बिज प्रक्रिया केलेले सोयाबीन पीक व शेडनेटची पाहणी बुलडाणा,(जिमाका) दि.30 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मौजे नांद्राकोळी तालुक्यातील सुभाष बाबुराव राऊत यांचे शेतावर संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 27 जुन 2021 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शेडनेटची पाहणी व चर्चा केली. त्यामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकॅडोर मिरची संदर्भत लागवड तंत्र, खत, एकात्मिक किड व्यवस्थापन, काढणी व्यवस्थापन, विक्री व्यवस्था या संदर्भात चर्चा व मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये भेट देवून सोयाबीन वाण एम ए यु एस 158 ची पाहणी केली. यावेळी उगवलेले सोयाबीन बिजांकुर हे निळ्या रंगाचे आढळून आले. या विषयी शेतकऱ्यांशी चर्चेअंती घरच्या सोयाबीन बियाण्याला कार्बनडेन्झीम व मॅन्कोझेब बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गावामध्ये कृषी विभागाने घरचे बियाणे वापरणे, उगवण क्षमता चाचणी घेणे व बिज प्रक्रिया मोहीम राबवून त्याचे महत...