Saturday 22 May 2021

DIO BULDANA NEWS 22.5.2021

मोबाईल मेडीकल युनीट वाहनाची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी मोबाईल युनीट वाहन जनतेच्या आरोग्य सेवेत रूजु लोणार, खामगांव व मेहकर तालुक्यातील दुर्गम भागात जावून देणार सेवा बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये मोबाईल मेडीकल युनीट प्रकल्पासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातही मोबाईल मेडीकल युनीट वाहन मंजूर झाले असून हे वाहन मेहकर, लोणार व खामगांव तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहे. या वाहनाची आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी वाहनांमधील वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. तसेच सुविधांविषयी माहिती घेतली. या मेडीकल युनीटचा जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांच्या वैद्यकीय गरजांसाठी पुरेपूर उपयोग करावा. कोविडच्या काळात युनीटमधील वैद्यकीय सेवांचा लाभ द्यावा. लसीकरण व कोरोना तपासणीसाठी युनीटचा वापर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. सदर मोबाईल मेडीकल युनीट चालविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ व वाहन चालक भरण्यात आला असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या युनीटमध्ये रक्त चाचणी, ताबडतोब अहवाल आदींसह अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी दिली. *************** वेळेत निदान व उपचार केल्यास म्युकर मायकोसिस पुर्ण बरा होतो जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची माहिती घाबरू नका.. जागरूक रहा बुलडाणा,(जिमाका) दि.22 : कोविड बाधीत रूग्णांमध्ये म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशी हा आजार दिसून येत आहे. म्युकर मायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य आजार आहे. या आजारावर वळेत निदान व उपचार केल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी जागरूक राहून उपचार घ्यावेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे यांनी आज दिली. म्युकर मायकोसिस हा आजार म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत, खतामध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकांत व नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. ज्या व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रूग्णांमध्ये म्युकर मायकॉसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते. ह्या आजाराचा धोका अधिक कुणाला आहे : ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा मधुमेह अनियंत्रीत आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे. ज्यांना इम्युनमोड्युलेटर्स अर्थात रोग प्रतिकारकशक्तीत फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे, ज्यांना जुनाट किडनी किंवा लिवरचा आजार आहे. म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी हे करा : रक्तातील साखरेची, एचबीए१सीची तपासणी करा, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा, कोविड नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायर मध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा, अँटिबायोटिक / अँटीफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. हे करू नका : आजाराची चिन्हे व लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरीयल सायनुसायटिसमुळे असावे असा विचार करू नका (विशेषत: इम्युनोसप्रेशन झालेले आणि कोविडमुळे ज्यांना इम्युनोमॉड्युलेटर्स चे उपचार दिले गेले आहेत) या आजाराची तपासणी करून घेण्यास आग्रही राहून दुर्लक्ष करू नका. धोकादायक परिणाम टाळण्यासाठी या लक्षणांवर लक्ष ठेवा : डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सुज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे व दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम. तरी वेळीच उपचार, निदान केल्यास म्युकर मायकोसिस पुर्णपणे बरा होतो. नागरीकांनी घाबरून न जाता जागरूक राहून उपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉ कांबळे यांनी केले आहे. ****************** कृषी सेवा केंद्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा* दूध विक्री केंद्र सकाळी 6 ते 9, सायं 6 ते रात्री 8 पर्यंत सुरू बुलडाणा, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 1 जून 2021 पर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे. तसेच या वेळे व्यतिरिक्त सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तू दुकाने, किराणा,स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने यांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी 7 ते सायं 7 पर्यंत मुभा देण्यात येत आहे. तसेच दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री सकाळी 6 ते सकाळी 9 आणि सायं 6 ते रात्री 8 सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरपोच दूध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामुर्ती यांनी दिले आहेत. **** जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 375 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 22 मे रोजी 375 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 22 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 7 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 19, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 3, निकम हॉस्पीटल 8, जाधव पल्स हॉस्पीटल 0, सहयोग हॉस्पीटल 5, आशिर्वाद हॉस्पीटल 26, सिद्धीविनायक हॉस्पीटल 8, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 7, संचेती हॉस्पीटल 6, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 2, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 1, सुश्रुत हॉस्पिटल 2, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 0, रेड्डी हॉस्पीटल 1, कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 4, चिखली : योगीराज हॉस्पीटल 29, हेडगेवार हॉस्पीटल 4, गुरूकृपा हॉस्पीटल 2, तायडे हॉस्पीटल 18, दळवी हॉस्पीटल 18, पानगोळे हॉस्पीटल 10, खंडागळे हॉस्पीटल 16, गंगाई हॉस्पीटल 3, जैस्वाल हॉस्पीटल 0, ओम गजानन हॉस्पिटल 2, सावजी हॉस्पीटल 24, अनुराधा मेमोरियल 8, तुळजाई हॉस्पीटल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 7, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 0, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 15, आशिर्वाद हॉस्पीटल 26, सिटी केअर 10, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 17, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 18, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 7, शामसखा हॉस्पीटल 14, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 18, चव्हाण 0, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 0, साई 0, झिऑन हॉस्पीटल 2, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 0, मापारी हॉस्पीटल 0, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 0, गोविंद क्रिटीकल 5, श्री. गजानन हॉस्पीटल 0, अजंता हॉस्पीटल 3, मेहकर मल्टीस्पेशालीटी 0, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 0, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 5, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 8, मी अँड आई हॉस्पीटल 0, तिरुपती कोविड सेंटर 1, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 6, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 2, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 12, असे एकूण 375 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा. यापूर्वी वापरलेल्या कुपी सॅनीटाईज करून तहसिल कार्यालयात प्रमाणपत्रासह जमा करून सुरक्षीत ठेवाव्यात. गैरवापर होणार नाही याची स्वत: तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे. ************

No comments:

Post a Comment