Monday 17 May 2021

DIO BULDANA NEWS 17.5.2021

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत 996 उपचारांचा लाभ गंभीर अवस्थेतील कोरोना बाधीत रूग्णांवर 20 पॅकेजखाली उपचार 6 खाजगी रूग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता बुलडाणा,(जिमाका) दि.17 : महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या एकत्रित योजनांतंर्गत राज्यात 996 उपचारांचा लाभ सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत उपचारासाठी केवळ शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा दाखला किंवा शासन मान्य छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. कोविड 19 साथरोगाच्या गंभीर अवस्थेतील रूग्णांना या योजनांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो. अशा गंभीर रूग्णांना व्हेंटिलेटरसह व व्हेंटीलेटरविना देण्यात येणाऱ्या 20 पॅकेजखाली उपचार मिळत आहे. कोविडवरील उपचारादरम्यान पॅकेजचा कालावधी संपला व उपचार पूर्ण झाला नसल्यास रूग्णाच्या कुंटूबाचे 1.50 लक्ष रूपये संपेपर्यंत उपचाराचा कालावधी लांबविता येतो. जर कुंटूंबातील सर्व सदस्य रूग्णालयात दाखल असतील व लॉकडाऊन सुरू असल्यास कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे उपचार थांबणार नाही. अशा परिस्थितीत फोन करूनही उपचार सुरू करता येतो. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत लाभार्थी कागदपत्रे सादर करू शकतात. इतर उपचारांसाठी हा कालावधी 7 दिवसांचा असेल. शिधापत्रिकेचा व्हॉटसॲपवर पाठविलेला फोटोही नोंदणीसाठी स्वीकारला जाणार आहे. कोविड च्या रूग्णाच्या उपचाराचा समावेश योजनेतील पॅकेजमध्ये होत असल्यास व त्याची पूर्वपरवानगी मिळाल्यास कोविड चाचणीचा खर्च पॅकेजमध्ये अंतर्भूत असणार आहे. जिल्ह्यात 6 खाजगी कोविड आजारावरील उपचारांना योजना अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालयांमध्ये किंवा कोविड उपचासाठी अंगीकृत केलेल्या रूग्णालयांमध्ये मिळणार असून अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक किंवा विभागीय व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 155388 किंवा 18002332200 क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व खाजगी व सरकारी अंगीकृत रूग्णालयांमध्ये 120 शासकीय राखीव प्रोसिजरवर उपचार केले जात आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेची 67 पैकेजेस सर्व अंगीकृत खाजगी रूग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णाला जास्त रकमेचे देयक अदा करण्यास सांगितले असल्यास अशावेळी रूग्णाने complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर व संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा समन्वयक यांच्या ईमेलवर तक्रार नोंदवावी. उपचार सुरू असताना महागड्या इंजेक्शनचा खर्च योजनेच्या पॅकेजमध्ये समाविष्ट नसल्यामुळे तो खर्च रूग्णास करावा लागणार आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक व जिल्हा समन्वयक यांनी कळविले आहे. ही आहेत खाजगी रूग्णालये मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हॉस्पीटल बुलडाणा, सिटी हॉस्पीटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पीटल चिखली . ************** कोविड साथरोगावरील आवश्यक उपाय योजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बुलडाणा,(जिमाका) दि.17 : कोविड 19 या साथरोगावरील विविध आवश्यक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर संबंधित कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा संबंधित कामे, ऑक्सिजन बेड, आयसीयु बेड संबंधित सर्व कामांची माहिती ठेवणे, खाजगी व शासकीय डेडीकेटेड कोविड हेल्थ हॉस्पीटल मधील मनुष्यबळ व्यवस्थापन करणे आदी कामांसाठी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे व सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश घोलप यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात होणारा लसींचा साठा व वितरण, लसीकरणाबाबत तक्रारी व त्यांचा निपटारा करणे आदी कामांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरवर भोजन, पाणी व स्वच्छतेबाबत नियोजन करणे, जिल्ह्यातील व इतर राज्यातील कामगार अथवा मजूर यांच्यासंदर्भातील सोपविलेली कामे यासाठी उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांना नोडल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आरटीपीसीआर, रॅपिड चाचणी संबंधित कामे व याबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे, प्रतिबंधीत क्षेत्र व काँन्टॅक्ट ट्रेसिंग बाबतचे सर्व काम, मेडीको ॲडमिनीस्टरीअल डेथ ऑडीट करणे यासाठी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे नोडल अधिकारी आहेत. जिल्ह्यातील वार रूम, कोविड समर्पित रूग्णालये, कोविड समर्पित आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर आदी संबंधित इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमीत करणे, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी करणे याबाबतील कामे यासाठी नायब तहसीलदार विजय पाटील यांना नोडल करण्यात आले आहे. औषध कंपनीकडून रेमडेसिवीरचा होणारा पुरवठा व वाटप यावर नियंत्रण ठेवणे, तसेच काळाबाजार थांबविण्यासाठी कार्यवाही करणे तसेच इतर उपाययोजना करणे या कामासाठी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे व सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अशोक बर्डे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे. ************ नवीन प्राणवायू निर्मिती उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांनी माहिती द्यावी *जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 17: शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ऑक्सिजन उत्पादकांसाठी धोरणाला मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे. आपल्या जिल्ह्यात नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उद्योजकांनी आपल्या नवीन ऑक्सिजन प्लांट ची उत्पादन क्षमता ( कॅपसिटी ), ठिकाण, संभाव्य गुंतवणूक व मनुष्यबळ, उद्योजकांचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती didic.buldhana @maharashtra.gov.in या ईमेल वर अथवा उद्योग अधिकारी सुनील पाटील यांच्या 7588616768 / 8788654257 व्हाट्सअप्प क्रमांकावर कृपया त्वरित पाठवावी. तरी अधिकाधिक नवउद्योजक यांनी माहिती पाठवावी जेणेकरुन प्राणवायू निर्मिती धोरणाचा लाभ देता येईल, असे आवाहन उद्योग अधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे. ***** जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 459 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 17 मे रोजी 459 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 17 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 4 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 12, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 2, निकम हॉस्पीटल 2, जाधव पल्स हॉस्पीटल 7, सहयोग हॉस्पीटल 7, आशिर्वाद हॉस्पीटल 15, सिद्धीविनायक हॉस्पीटल 16, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 7, संचेती हॉस्पीटल 9, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 7, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 0, सुश्रुत हॉस्पिटल 8, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 6 , रेड्डी हॉस्पीटल 3 , कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 4, चिखली : योगीराज हॉस्पीटल 16, हेडगेवार हॉस्पीटल 6, गुरूकृपा हॉस्पीटल 21, तायडे हॉस्पीटल 6, दळवी हॉस्पीटल 22, पानगोळे हॉस्पीटल 18, खंडागळे हॉस्पीटल 17, गंगाई हॉस्पीटल 5, जैस्वाल हॉस्पीटल 13, ओम गजानन हॉस्पिटल 2, सावजी हॉस्पीटल 16, अनुराधा मेमोरियल 8, तुळजाई हॉस्पीटल 0, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 5, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 6, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल 15, आशिर्वाद हॉस्पीटल 4, सिटी केअर 8, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 15, श्री गजानन कोविड हॉस्पिटल 0, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 13, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 12, शामसखा हॉस्पीटल 16, खामगाव : श्रीराम हॉस्पीटल 0, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 0, चव्हाण 8, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 13, साई 0, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 11, मापारी हॉस्पीटल 2, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 0, गोविंद क्रिटीकल 8, श्री. गजानन हॉस्पीटल 5, अजंता हॉस्पीटल 6, मेहकर मल्टीस्पेशालीटी 16, राठोड हॉस्पिटल 0, दिवठाणे 2, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 0, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 6, मी अँड आई हॉस्पीटल 6, तिरुपती कोविड सेंटर 1, सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 9, आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बिबी ता. लोणार 7, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 8, असे एकूण 683 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र पुरवठा झालेल्या इंजेक्शन ची संख्या बघता राखीव कोट्यातील इंजेक्शन चा पुरवठा सुध्दा रुग्णालयांना करण्यात येत आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा. यापूर्वी वापरलेल्या कुपी सॅनीटाईज करून तहसिल कार्यालयात प्रमाणपत्रासह जमा करून सुरक्षीत ठेवाव्यात. गैरवापर होणार नाही याची स्वत: तहसिलदार यांनी दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment