Posts

Showing posts from January, 2021

DIO BULDANA NEWS 29.1.2021,1

Image
  राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2020 प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ              बुलडाणा  ( जिमाका ),  दि. 29 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.              राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने    dgip...

DIO BULDANA NEWS 29.1.2021

  लोकसेवा हक्क अधिनियमातंर्गत 486 शासकीय सेवा बुलडाणा,(जिमाका) दि. 29 :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला आहे. या अधिनियमावर 28 एप्रिल 2015 पासून अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे. या कायद्यातंर्गत विविध 40 शासकीय कार्यालयांमधील 486 प्रकारच्या सेवांचा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबर 2015 ते डिसेंबर 2020 या कालावधीत महसूल विभागाच्या 18 अधिसुचीत सेवांचे एकूण 24 लक्ष 9 हजार 650 एवढे अर्ज ऑनलाईन स्वरूपात प्राप्त झाले आहे. त्यापैकी 24 लक्ष 274 एवढे ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्या आलेले आहे.   सर्व सेवा ह्या विहीत कालावधीत पुरविण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याकरीता ग्रामपंचायत, तालुका स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्र देण्यात आलेले आहेत. नागरिक या केंद्राचा उपयोग करून हव्या असलेल्या सेवा करीता ऑनलाईन अर्ज पोर्टलवर करू शकतात. तसेच  aaplesarkar.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावरून देखील नागरिक स्वत: अर्ज करू शकतात. सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाने नागरिकांच्या सुवि...

DIO BULDANA NEWS 28.1.2021

         कोरोना अलर्ट : प्राप्त 838 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 47 पॉझिटिव्ह • 31 रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि. 28 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 843 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 838 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 47 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 43 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 683 तर रॅपिड टेस्टमधील 155 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 838 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, सवणा 1, रानअंत्री 1, उंद्री 1,  चिखली शहर : 10,  दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, खामगांव शहर : 5, खामगांव तालुका : पळशी 1, शेलोडी 1, पोरज 1,  बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, लोणार शहर : 2,  लोणार तालुका : शिवणी पिसा 1, शेगांव शहर : 7, मलकापूर तालुका...

DIO BULDANA NEWS 27.1.2021

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 1625 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 44 पॉझिटिव्ह • 89 रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि. 27 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1709 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1625 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1561 तर रॅपिड टेस्टमधील 64 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1625 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   चिखली शहर : 8, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, मुंगसरी 1, चांधई 1,  खामगांव तालुका : जळका भडंग 1, मेहकर शहर : 11, बुलडाणा शहर : 10, मोताळा तालुका : परडा 1, मोताळा शहर : 1, नांदुरा तालुका : अंभोडा 1, जवळा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : दे. मही 2,  जळगांव जामोद शहर : 1,  मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना  य...

DIO BULDANA NEWS 26.1.2021

Image
          कोरोनावर मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार -           पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात कर्जमुक्ती योजनेतून  1  लक्ष  69 हजार 596  शेतकऱ्यांना  1121  कोटी ं चा लाभ शिव भोजन थाळी योजनेतून 5 लक्ष 41 हजार 169 लाभार्थ्यांना लाभ गुटखामुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार कोविड लसीकरण मोहिमेत 2500 लाभार्थ्यांना आतापर्यंत लस बुलडाणा,(जिमाका) दि. 26 :   कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूने आपणाला चिंताक्रांत बनविले होते. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश आले. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार , असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.      भारतीय प्रजासत्ताकाचा 7 1  वा वर्धापन दिनाचा मुख्य शास...