Friday 18 December 2020

DIO BULDANA NEWS 18.12.2020

 फिट इंडीया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणीसाठी 27 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ

        बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सुचनेनुसार फिट इंडीया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्‍यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांची नोंदणी शाळांनी (प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या असून, त्यानुसार बुलडाणा जिल्‍ह्यात नोंदणी दि.15 डिसेंबर 2020 पर्यंत करावयाची अंतिम तारीख होती. अद्यापही काही शाळांची नोंदणी प्रक्रीया बाकी असल्याने सदरील नोंदणीची मुदत दि. 27 डिसेंबर 2020 पर्यत वाढविण्यात येत आहे.

   यासाठी ज्या शाळांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल त्यासाठी ही शेवटची संधी आहे. या कालावधीत शाळांनी नोंदणी न केल्यास संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शाळांकडून खुलासा मागवून घेतला जाईल. शाळा नोंदणी https://schoolfitness.kheloindia.gov.in/staticpage/landingpage.qspx या पोर्टलवर जाऊन करावी. यासाठी लॅपटॉप किंवा डेक्सटॉपचा वापर करावा. शाळा नोंदणी बाबतचा व्हिडीओ आपणाला https://www.youtube.com/watch?v= TmvNTgFvpyM या लिंकवर पाहता येईल.

            तसेच खेलो इंडीयाच्या ॲपवर इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे, शाळेत शारीरिक शिक्षक उपलब्ध नसल्यास सबंधित प्राचार्यांनी/मुख्याध्यापक यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. शाळा जर एक शिक्षकी असेल तर त्याच शिक्षकाने आपली नोंदणी करावी. नियुक्त शिक्षकाने Android फोनवर khelo India School Version हे ॲप डाऊनलोड करुन https://Play.google.com/ store/apps/developer?id=sports+athority+of+india या लिंकचा वापर करावा. तसेच IOS फोन असेल तर https://apps.apple.com/in/app/khelo-india-school-version/id1535425198 या लिंकचा वापर करावा. सदर नोंदणीचा Demo Video https://www.youtube.com/watch?v=gro-sygq85o च्या मदतीने आपल्याला नोंदणी करता येईल.

            अशा प्रकारे शाळा व नोंदणीची प्रक्रीया 27 डिसेंबर 2020 पर्यंत पुर्ण करावी. नोंदणी करतांना सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आय टी शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. अशा सुचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे संचालक राहुल व्दिवेदी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळा/महाविद्यालय यांनी दि.27 डिसेंबर 2020 पुर्वी हा कार्यक्रम राबवुन शासनाचा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवावा असे आवाहन शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

                                                                        **********

थकबाकीदारांनी थकीत मुद्रांक शुल्क व दंडाचा भरणा करावा

  • भरणा न केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार

   बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे थकीत मुद्रांक शुल्क वसूली प्रकरणी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 46 नुसार थकीत जमीन महसूल कार्यवाही प्रारंभ करणे आवश्यकआहे.  सदर नमुद थकबाकीदार यांनी थकीत रकमा वसूल करण्यात येणार आहे. थकबाकीदाराचे अखेरचे ज्ञात पत्त्यावर नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. त्याद्वारे निर्धारीत केलेल्या मुदतीच्या आत त्यांच्या नावासमोरील थकीत मुद्रांक शुल्क व दंडाचा भरणा  थकबाकदारांनी करावा. भरणा केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

   थकबाकीदार पुढीलप्रमाणे - पक्षकाराचे नाव मो. अकील मो. जलील रा. वर्धा ता. जि.वर्धा, दस्त क्रमांक वर्ष 6530/2013, मिळकत तपशिल मौजे खामगांव सर्व्हे नं. 43/1 क्षेत्र 1 हे 13 आर 50 टक्के हिस्सा याप्रमाणे 0 हेक्टर 57 आर शेत जमिन, थकबाकी रक्कम 28000 रुपये, उद्घोषणा नोटीस दि. 24 जानेवारी 2019. पक्षकाराचे नांव पत्ता संतोष रामचंद्र पमनाणी, रा. मेन रोड खामगांव, दस्त क्र.वर्ष 1263/2013, मोजे खामगांव नझुल शिट क्र. 47 बी. ले. प्लॉट क्र. 42 क्षेत्रफळ 924.00 चौ. मी. व बांधकाम क्षेत्र 200 चौ. मी., थकबाकी रक्कम 130020 उद्घोषणा नोटीस 1 डिसेंबर 2020. पक्षकाराचे नांव विनय उत्तमचंद पारख, शामसुंदर वासुदेव अग्रवाल दोघेही रा. 122 नविन पेठ जळगांव खांदेश, विजयकुमार चंद्रभानदास पाहुजा रा. 21 गणपती नगर, पायोनियर क्लबच्या समोर जळगांव खांदेश, दस्त क्र.वर्ष 1048/2014, मौजे खामगांव येथील

सर्व्हे नं. 165 सिटी सर्व्हे नं. 4/1 शिट क्र. 42 क्षेत्र 1 हेक्टर 20 आर, थकबाकी रक्कम 1850750, उद्घोषणा नोटीस दि. 1 डिसेंबर 2020..

   वरील तीनही थकबाकीदारांना नोंदणीकृत डाकेने नोटीस बजावण्यात आलेली आहे. या पक्षकारांनी निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत नावासमोर दर्शविण्यात आलेली थकीत मुद्रांक शुल्क त्यावरील दंडाचा भरणा करावा व पुढील जप्तीची कार्यवाही टाळावी, असे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकारे कळविले आहे.

                                                                                                                *******

कोरोना अलर्ट : प्राप्त 572 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 51 पॉझिटिव्ह

•       21 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 623 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 572 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 51 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 492 तर रॅपिड टेस्टमधील 80 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 572 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 6, दे. राजा शहर : 5, बुलडाणा शहर : 10,  खामगांव शहर : 1,  सिं. राजा तालुका : शेंदुर्जन 2, नागझरी 3, चिखली तालुका : आंधई 1, नायगांव 1, वरखेड 2,  चिखली शहर : 5, मलकापूर शहर: 5, मलकापूर तालुका: धरणगाव 1, खामगाव तालुका: बोथा काजी 1, नांदुरा तालुका : माळेगाव गोंड 1, नांदुरा शहर : 1, शेगाव तालुका: टाकळी 1, मोताळा तालुका: धामणगाव 1, शेलापूर 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 51 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे मलकापूर येथील 50 वर्षीय पुरूष रूग्णाचा  उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 21 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :   बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 7,  नांदुरा : 3, सिं. राजा : 3, खामगांव : 3, लोणार : 3,  चिखली : 2.

तसेच आजपर्यंत 82998 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11593 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11593 आहे. 

  तसेच 1890 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 82998 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12038 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11593 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 300 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 145 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                                                **********

No comments:

Post a Comment