Wednesday 2 September 2020

DIO BULDANA NEWS 2.9.2020

 कोरोनाच्या चाचण्या वाढवून संसर्गावर नियंत्रण मिळवावे

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • कोरोना संसर्ग आढावा बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.2 :   कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील  कोरोना निदान चाचण्यांचा वेग वाढविला पाहिजे. रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या कराव्यात. कोरोनाच्या चाचण्या वाढवून संसर्गावर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

 जिल्हा सामान्य रूग्णालयात  जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या दालनात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्ग आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलिप पाटील- भुजबळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  कोविड रूग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, लॅबची यंत्रसामुग्री अद्ययावत असावी. त्वरीत प्रयोगशाळा सुरू करावी.  तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे  कोवीड रूग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावला असून तेथे पूर्ण स्टाफ उपलब्ध करून देण्यात आल आहे. जिल्ह्यामध्ये चाचण्या वाढवून कोरोनावर कसे नियंत्रण ठेवता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली.  या संदर्भात लोकप्रतीनिधी व तज्ज्ञांची लवकरच बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेण्यात यावे.  ऑक्सिजन टॅंक उभारणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री यांनी कोविड संदर्भात विविध अडचणी जाणून घेतल्या.

*******

कोरोना अलर्ट : प्राप्त 361 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 107 पॉझिटिव्ह

  • 41 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 468 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 361 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 107 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 90 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 250 तर रॅपिड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 361 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  मेहकर : 7, सिं. राजा : 8, मोताळा  : 4, लोणार : 7, जळगांव जामोद : 11, बुलडाणा : 11, विष्णूवाडी 2, द्वारका नगर 2,   चिखली : 4, लुंबिनी नगर 1,  मलकापूर : 1, दे. राजा : 15, शेगांव : दुर्गा नगर 1, जिजामाता नगर 4,  खामगांव : केशव नगर 1, पोलीस वसाहत 1, तलाव रोड 2, खामगांव तालुका : लाखनवाडा 2,  चिखली तालुका : मेरा बु 1, जांभोरा 1, भरोसा 3, कोनड 2, शेगांव तालुका : टाकळी विरो 2,    मोताळा तालुका : बोराखेडी 1, रोहीणखेड 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मलकापूर पांग्रा 1,  बुलडाणा तालुका : सावरगांव 1, सोमठाणा 1, माळविहिर 1, वरवंड 1,   नांदुरा : 2, मलकापूर तालुका : शिराढोण 1,   लोणार तालुका : सुलतानपूर 1,  दे. राजा तालुका : सरंबा 1, मेंडगांव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 107  रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान जळगांव जामोद येथील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 1, सुंदरखेड 2, तानाजी नगर 1, बालाजी नगर 2, लहाने ले आऊट 1, इकबाल नगर 3,   नांदुरा शहर : संकल्प कॉलनी 1, शिवाजी  नगर 2, भावसार देवी मंदीराजवळ 1, पोलीस स्टेशन रोड 1,   खामगांव शहर : राठी प्लॉट 1, चिखली शहर : 1, संभाजी नगर 1, वाल्मिकी नगर 1, चिखली तालुका : शिंदी हराळी 2, दे. राजा तालुका : दे. मही 1,  दे. राजा शहर : माळीपुरा 1, जुना जालना रोड 1, सिव्हील कॉलनी 1, बालाजी फरस 1,  बालाजी नगर 3,  मलकापूर तालुका : भालेगांव 3,  सिं. राजा तालुका : दुसरबीड 2, हिवरखेड 3, साखरखेर्डा 1,  मेहकर तालुका : चायगांव 1, मेहकर शहर : रामनगर 1, जळगांव जामोद तालुका :पिं. काळे 1,      

   तसेच आजपर्यंत 18462 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2306 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2306 आहे. 

  आज रोजी 1216 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 18462 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3329 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2306 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 974 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 49 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

**************

मुलींच्या संख्येबाबत सुक्ष्म सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्यात

-          प्रमोदसिंह दुबे

  • बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : मुलींच्या जन्माचे स्वागत करून समाजातील स्त्री भ्रुण हत्येचा कलंक पुसून टाकण्यात यावा. त्यासाठी मातृ संवर्धन दिवस साजरा करण्याची कार्यवाही करावी. मुलींच्या संख्येबाबत सुक्ष्म सर्वेक्षण करून अत्यंत काटेकोर नियोजनातून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्री. रामरामे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  कोणत्या तालुक्यात व विशेषत: कोणत्या गावात मुलींचे प्रमाण प्रती हजारी मुलांमांगे कमी आहे याबाबत सर्वेक्षण करण्याचे सांगत अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, यामधून अशा गावांमध्ये अभियानावर जास्त लक्ष केंद्रीत करता येईल. त्यामुळे स्त्री लिंग गुणोत्तर प्रमाण सम करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पोषण आहारासंदर्भात वितरणाचा अहवाल नियमितरित्या ग्रामपा तळीवरून घेण्यात यावा. या अहवालाची शहानिशा करावी.  जिल्ह्यात 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील खुजे व बुटके पणाचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. याबाबत काम करावे. असेही त्यांची सूचीत केले. बैठकीला संबधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                                ****

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दिवंगत झाल्यामुळे 7 दिवसांचा दुखवटा

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट रोजी दिवंगत झाले आहे. दिवंगत नेत्यास आदरांजली म्हणून संपूर्ण देशात 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज दररोज उभारण्यात येतो. त्या ठिकाणी याय कालावधीत तो अर्ध्यावर उभारण्यात येवून दुखवटा पाळला जात आहे. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम या कालावधित करण्यात येवू नये, असे अप्पर  जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.  

                                                                                                                                *****

No comments:

Post a Comment